विजापूर : छत्तीसगड राज्यातील विजापूर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाचे ५ सैनिक हुतात्मा झाले. यामध्ये सीआरपीएफचे ४ तर डीआरजीचा १ सैनिकांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या चकमकीत एका नक्षलीचा खात्मा करण्यात आला. छत्तीसगडमधील ही १० दिवसांतील दुसरी घटना असून यापूर्वी २३ मार्चला झालेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामध्ये नक्षलवाद्यांनी नारायपूरमध्ये आयईडी स्फोटातून हा हल्ला घडवला होता.
पोलिस अधीक्षक कमल लोचन यांनी सांगितले की, "सध्या सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरु असून यामध्ये अजून काही जवान गंभीर असल्याचे माहित मिळत आहे. ही घटना विजापूरमधील टेरिम पोलिस स्टेशनच्या परिसरातील झीरम हल्लाचा मास्टरमाइंड हिडमाच्या गावात सुरु आहे. यामध्ये सामील नक्षलवादी या टीमचे सदस्य असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावात बरेच नक्षलवाद्यांची जमावजमव सुरु असल्याची बातमी सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार ही टीम त्यांच्या शोधासाठी बाहेर पडली होती."