पंखांना 'टॅग' लावून गिधाडांच्या पिल्लांची मुक्तता; कोकणातील पहिलाच प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2021   
Total Views |
vulture_1  H x


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
श्रीवर्धन (shrivardhan) तालुक्यात घरट्यामधून पडून जखमी किंवा अशक्त झालेल्या गिधाडांच्या (vulture) पिल्लांना उपचाराअंती नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. मात्र, मुक्त करण्यापूर्वी भविष्यात त्यांच्याविषयी शास्त्रीय माहितीचे संकलन करण्यासाठी त्यांना टॅग लावण्यात आले. चार गिधाडांच्या (vulture) पायाला आणि पंखाला टॅग लावून त्यांना सोडण्यात आले आहे.
 
 

 
सद्यपरिस्थितीत कोकणामध्ये गिधाडांची (vulture) मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते. जिल्ह्यातील म्हासाळा (mahasala) आणि श्रीवर्धन (shrivardhan) तालुक्यात गिधाडांचा अधिवास आहे. याठिकाणी प्रामुख्याने पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा (vulture) कायमस्वरूपी अधिवास आहे. या तालुक्यामध्ये घरट्यामधून पडून जखमी झालेली किंवा अशक्त असलेली गिधांडाची (vulture) पिल्ले स्थानिकांना सापडतात. अशाच अशक्त आणि जखमी पिल्लांवर 'सिस्केप' संस्था आणि वन विभागाकडून उपचार करण्यात येतात.
 
 


मार्च महिन्यामध्ये वन विभागाला श्रीवर्धनमध्ये (shrivardhan) गिधाडांची (vulture) चार पिल्ले मिळाली होती. या पिल्लांवर 'सिस्केप' संस्थेच्या सदस्यांनी आठ महिने उपाचार केले आणि त्यांचे वजन तीन किलोपेक्षा अधिक झाल्यानंतर रविवारी त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. सोडण्यापूर्वी त्यांच्या पायाला आणि पंखांना टॅग लावण्यात आले. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी पक्षी अभ्यासकांकडून पक्ष्यांच्या पायात रिंग आणि पंखाना टॅग लावण्यात येतो. अशाच प्रकारे पुण्याच्या 'ईला फाऊंडेशन'कडून श्रीवर्धनमधून सोडलेल्या गिधाडांना (vulture) टॅग लावण्याचे काम करण्यात आले. साधारण १० ते ११ महिन्यांच्या पांढरी पाठीच्या गिधाडांच्या प्रजातीमधील दोन मादी आणि दोन नर पिल्लांच्या एका पायात रिंग आणि दोन्ही पखांच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला लाल रंगाचे टॅग लावल्याची माहिती 'ईला फाऊंडेशन'चे अध्यक्ष डाॅ. सतीश पांडे यांनी दिली. त्यानंतर त्यामधील दोन पिल्लांना श्रीवर्धन आणि दोन पिल्लांना म्हसाळ्यामधून सोडल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात अशाप्रकारे प्रथमच गिधाडांना (vulture) टॅग करण्याचे काम झाले आहे.
 
 
 
या पक्ष्यांना राज्याचे वनबल प्रमुख पी.साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, रोह्याचे उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत आणि 'सिस्केप'चे प्रमुख व रायगडचे मानद वन्यजीव रक्षक प्रेमसागर मेस्त्री यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. A 61, A 62, A 63 आणि A 64 या सांकेतिक क्रमाकांचे टॅग लावलेले गिधाडे (vulture) कुठे दिसल्यास 9822193707 (डॉ. सतीश पांडे) आणि 9657864290 (प्रेमसागर मेस्त्री) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

@@AUTHORINFO_V1@@