मुंबईत वायू प्रदूषणाचे तीनतेरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |
air pollution _1 &nb


आज हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' स्तरावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आज मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांक 'अत्यंत वाईट' स्तरावर नोंदवण्यात आला आहे. हवेचा निर्देशांक ३१३ असल्यांची असल्याची नोंद 'सफर'ने केली आहे. तापमानात घट झाल्याने वातावरणात वाढलेल्या आर्दतेमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली असून पुढील महिनाभर हवेची गुणवत्ता 'वाईट' किंवा 'अत्यंत वाईट' स्तरावर कायम राहील असा अंदाज आहे. 
 
राज्यात थंडीचा पार वाढल्यापासून हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबईत १५ अंशापर्यंत, तर नाशिक-पुण्यात ५ ते ६ अंशापर्यंत तापमान उतरले आहे. तापमानातील बदलाचा हा परिणाम येत्या काही दिवसांमध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे वायू प्रदूषणातील वाढीमध्येही सातत्य राहण्याची शक्यता आहे. हवेमधील २.५ पीएम हे कण प्रदूषणास कारक असतात. उन्हाळ्यातील उष्ण हवा हलकी असल्याने हे प्रदूषित कण हवेसोबत उंचावर वाहून जातात. मात्र, हिवाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी धूलीकण जमिनीलगतच राहतात. परिणामी हिवाळ्यात धूर आणि धूक्यांचे मिश्रण होऊन धूरके तयार होते. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते.
 
 
गेल्या काही दिवासांपासून मुंबई, पुणे आणि नाशिकच्या तापमानाचा पारा उतरू लागल्यावर तेथील हवेची गुणवत्ताही ढासळत असलेली पाहावयास मिळाली आहे. भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या 'सफर' या अॅपमधील आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक शहराची सकाळची गुणवत्ता ही 'अंत्यत वाईट' स्तरावर नोंदविण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपासून मुंबईची हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. त्यादिवशी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३२० नोंदविण्यात आला होता. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्या दिवशी हा निर्देशांक ३०२ नोंदिवण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून हा स्तर ३०२ ते ३१० च्या दरम्यान होता. मात्र, आज त्यामध्ये वाढ झाली असून हा निर्देशांक ३१३ असल्याची नोंद सफरने केली आहे. या निदर्शेकांनुसार हवेच्या गुणवत्तेचा स्तर ० ते ५० (चांगली), ५१ ते १०० (समाधानकारक), १०१ ते २०० (मध्यम), २०१ ते ३०० (वाईट), ३०१ ते ४०० (अती वाईट) आणि ४०१ ते ५०० (धोकादायक) अशा प्रकारे मोजले जाते. 
@@AUTHORINFO_V1@@