वाहतुक पोलीस धरणार सोशल मिडीयाची कास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2021
Total Views |

Thane_1  H x W:
 
 
 
 
ठाणे (दीपक शेलार) : ठाणे पोलिसांच्या शहर वाहतुक शाखेद्वारे वाहतुक सुरक्षाविषयक जनजागृती व्हावी तसेच, जनसामान्यांच्या तक्रारी व सुचनांना जलद प्रतिसाद देता यावा. याकरिता, आता सोशल मिडियाची कास धरण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, नूतन वर्षात लवकरच वाहतुक शाखेचे अधिकृत फेसबुक पेज, इन्स्टाग्राम अकाऊंट व अन्य सोशल माध्यमे सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे, नागरिकांनाही आपल्याला भेडसावणाऱ्या तक्रारी व सूचना करणे सहजसुलभ होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
 
 
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत असून तुलनेत रस्त्यांची संख्या तुटपुंजी पडत आहे. मुख्य रस्त्यांना जोडरस्ते, सेवा रस्ते उभारण्यासह उड्डाणपूल आणि सबवे निर्माण केले जात आहेत. त्याचबरोबर मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचे पर्यायदेखील उपलब्ध करण्याचे प्रयत्न प्रगतीपथावर आहेत. इतक्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या तरी, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन झाले नाही. तर, बाका प्रसंग ओढवू शकतो.
 
 
किंबहुना कोंडीचा त्रास होत असतो. परंतु, वाहतूक नियमाची, उपक्रमांची तात्काळ माहिती देण्याची अथवा वेळोवेळी अपडेट देण्याची कुठलीही सार्वजनिक व्यवस्था वाहतुक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे हेरून ठाणे शहर वाहतुक शाखेने आता सोशल मिडियाची कास धरण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, लवकरच फेसबुक, इन्स्टाग्राम व अन्य सोशल माध्यमांमध्ये सक्रिय होण्याची तयारी सुरू केली आहे. या नव्या प्रयोगामुळे शहरातील वाहतुकीबाबत सोशल मिडीयातुन सुचना व माहितीची देवाण- घेवाण सुलभ होऊन उपाययोजना करण्यास तसेच,फिडबँक घेतला जाणार आहे.
 
 
मध्यंतरी, पत्री पुलाच्या कामावेळी वाहतुक शाखेदवारे वाहतुकीच्या घडामोडी व सुचनांबाबतची अपडेट वेळोवेळी दिल्याने वाहतुक सुरळीत ठेवण्यास मदत झाली होती. कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊन काळात घरबसल्या सर्वानीच दैनंदिन उपयोगासाठी सोशल मिडियाचा सदुपयोग केला होता. या पार्श्वभूमीवर सोशल मिडियाद्वारे नागरिकांशी कनेक्ट राहण्याचे वाहतुक विभागाने ठरवले असून यासाठी ई-सेल अथवा स्वतंत्र विभाग स्थापन केला जाणार आहे.
 
 
ठाणे जिल्ह्यात १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ ब्लॅक स्पॉट हे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आहेत. याशिवाय,मेट्रो प्रकल्पासह विविध विकासकामे,रस्ते-पुलांची कामे सुरू असल्याने वाहतुक नियमनाचे तीनतेरा उडत असुन नेहमीच वाहतुक कोंडीचा त्रास नागरिकांना करावा लागतो.तसेच, बेदरकार वाहने हाकणाऱ्याची संख्या वाढत असल्याने अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखेकडुन विविध उपक्रम राबवले जात आहेत.
 
 
"सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी सर्वाचीच असुन दंडाला पात्र ठरण्यापेक्षा नागरिकांनीही खबरदारी घेऊन सुरक्षेच्या उपाययोजना,नियम पाळले तर अपघातांचे प्रमाण कमी करता येईल.या वर्षापासून वाहतुक सुरक्षा सप्ताह पंधरवडयाऐवजी महिनाभर असुन १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत रस्ते सुरक्षा मोहिम राबवली जाणार आहे.यावेळी वाहतुक विभागाच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम आदी माध्यमांचा अवलंब सुरू करण्याचा मानस आहे. " असे वाहतुक शाखाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@