दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलला सुरू होणार..

    21-Jan-2021
Total Views | 76

 


 
EXAM_1  H x W:

 

 दहावीची लेखी परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे व  बारावीची २३ एप्रिल ते २९ मे पर्यंत 
 

मुंबई:राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यात कमी होत असतानाच आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येत असल्याची पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

 

राज्य शिक्षण मंडळाची दहावीची लेखी परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत घेतली जाणार असून हा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. तर, बारावीक्षा ही २३ एप्रिल ते ची लेखी परी२९ मे या कालावधीत घेतली जाणार असून बारावीच्या परीक्षेचा निकाल हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. या परीक्षा घेताना राज्यातील स्थानिक स्तरावरील माहिती घेऊनच त्यासाठीचे नियोजन केले जाणार असून, कोविड आणि त्यासंदर्भातील सर्व खबरदारी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या परीक्षांच्या कालावधीत एखादा विद्यार्थी क्वारंटाईन अथवा कोविडमुळे परीक्षेला मुकला, तर त्याच्या फेरपरीक्षेसंदर्भातही निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासोबत इतर केंद्रीय शिक्षण मंडळांनी आपल्या दहावी-बारावीच्या परीक्षांची वेळापत्रक आणि त्यांचे नियोजन जाहीर केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा आणि त्यांचे वेळापत्रक कधी जाहीर केले जाईल, याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. दहावीच्या लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा या ९ ते २८ एप्रिल या दरम्यान, तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या १ ते २२ एप्रिल दरम्यान घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

 

अग्रलेख
जरुर वाचा
ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121