पुण्यात कोरोनाग्रस्त पत्रकारांसाठी रा.स्व.संघाचा पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |
Pandurang Raikar_1 &
 


पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणानंतर पत्रकारासांठी प्रथमच राखीव बेड



पुणे
: जम्बो रुग्णालयात व्हेंटीलेटर आणि रुग्णवाहिकेअभावी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. पुण्यात वार्तांकन करताना अनेक पत्रकार कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व म्हणून रा.स्व.संघाने पुढाकार घेतला आहे. रा. स्व. संघाशी संलग्न संस्था 'समर्थ भारत संयोजक' सचिन भोसले यांनी डेक्कनवरील 'कर्वे स्त्री शिक्षण संस्था वसतिगृह' येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये पुण्यातील कोरोनाबाधित पत्रकारांसाठी एकूण ३५ बेड्सची व्यवस्था केली आहे. 
 
 
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांना या प्रकरणी माहिती देण्यात आली आहे. पत्रकार संघ आणि कोविड सेंटर यांच्यातील व्यवस्थापनात समन्वय असावा यासाठी एका कार्यकर्त्याची नेमणूक केली जाणार आहे. पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील आरोग्य प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पत्रकारांची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांसाठी राखीव कोरोना बेड उपलब्ध करून देणारा पुण्यातील हा पहिलाच उपक्रम मानला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@