पुण्यात ऑक्सिजनची व अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता ; अजित पवारांची कबुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2020
Total Views |

ajit pawar_1  H


पुणे :
पुण्यातील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. परिणामी अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. कोविड १९ विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच यावेळी रुग्णसुविधांच्या अभाव असल्याचेही कबुल केले.




“पुण्याच्या जम्बो हॉस्पिटलच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे ते हॉस्पिटल सांभाळत आहेत त्यांना जमत नसेल तर नवीन टीम तिथे नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जम्बो सेंटरमध्ये स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे की व्यवस्थित आहे हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार आहे. तसेच जम्बो सेंटरमध्ये कॅमेरा लावणार आहे.” असेही अजित पवारांनी सांगितले. तसेच नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. जवळपास २५ ते ३० टक्के नागरिक मास्क वापरत नाही. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवलंच पाहिजे, मास्क वापरलंच पाहिजे. वेळोवेळी सॅनिटायझर किंवा स्वच्छा हात धुणं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असे आवाहन नागरिकांना केली. ते पुढे म्हणाले, ऑक्सिजनच हवा तसा पुरवठा होत नाहीये. आज सकाळीच याबाबत चीफ सेक्रेटरींशी बोलणे झले असून राजेश टोपेंनी काल याबाबत बैठक घेतली होती. ऑक्सिजन तयार करणारे कारखाने औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजन दिलं जातं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन आधी दिलं पाहिजे. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना सांगितले असून ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून काही विपरीत घडू नये, याची खबरदारी घेण्याबाबत माहिती दिल्याचे अजित पवारांनी सांगितले. अजित पवार म्हणाले,ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत माहीत हे वस्तूस्थिती आहे. अ‍ॅम्ब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे. ससूनचा ऑक्सीजन तुटवडा प्रॉब्लेम झाला म्हणून जम्बोत पेशंट पाठवले. पुण्यात लॉकडाऊन उठवण्यावरून मुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका होती पण पुण्यातील व्यापारी आक्रमक होते. म्हणून लॉकडाऊन उठवले अशी माहितीही त्यांनी दिली.




रुग्णवाहिकेबद्दल माहिती मिळावी याबाबत उपायोजना केल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी अधिवेशनात सार्वजनक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग यासाठी काय गरजेचे आहे. कोरोना संकटात लढत असणाऱ्या सगळ्या विभागांची माहिती आम्ही घेतली आहे. त्याबाबत पुरवणी मागण्यांमध्ये या सगळ्या विभागांसी संबंधित मागण्या कशा आणता येतील, याबाबत प्रयत्न करु, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@