लॉकडाऊनमध्येही विक्रमी जीएसटी कलेक्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |
GST _1  H x W:


नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळातही जून महिन्यातील जीएसटी कलेक्शन ९० हजार ९१७ कोटी इतके झाले आहे. गतवर्षात जून महिन्यात ९९ हजार कोटींच्या तुलनेत ९ टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. एप्रिल आणि जून तिमाहीतील कर महसुलात एकूण ५९ टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. अर्थमंत्रालयातर्फे याबद्दल माहिती जारी करण्यात आली आहे.

 
 
मे महिन्यात जीएसटी कलेक्शन ६२ हजार कोटी रुपये


केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ३२ हजार २९४ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गोळा झाला होता. मे मध्ये हा दुप्पट होऊन ६२ हजार कोटींवर पोहोचला. जून मध्ये पुन्हा यात ५० टक्के वाढ झाल्यानंतर ९० हजार कोटींवर पोहोचला आहे. दरम्यान, लॉकडाऊन पूर्वी दर महिन्याला सरासरी जीएसटी महसुल हा १ लाख कोटींवर पोहोचत होता.
@@AUTHORINFO_V1@@