पाककडून भारतीय दूतावासातील २ अधिकाऱ्यांचा छळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2020
Total Views |

pakistan_1  H x



इस्लामाबाद :
पाकिस्तानमधील भारतीय दूतावसाच्या दोन कर्मचाऱ्यांसोबत अत्याचार करून ओलिस ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण केलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी सोडल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचे कळते. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून त्यांना मारहाण करण्यात आली होती अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांना अशुद्ध पाणी पिण्यासाठी देण्यात आले.




समोर आलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयात काम करणारे दोन भारतीय अधिकारी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हाय-कमिशनकडे जाण्यासाठी त्यांच्या वाहनाने निघाले होते. परंतु ते उच्चायुक्तालयात पोहोचले नाहीत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत पाकिस्तानचे कार्यकारी उच्चायुक्त यांना याबाबत महिती दिली. या कर्मचाऱ्यांना सकाळी ८.३० ते ८.४५च्या दरम्यान पेट्रोल पंपावरुन सुमारे १५ ते १६ सशस्त्र लोकांनी ताब्यात घेतले. मग त्यांना डोळ्यावर पट्टी बांधत त्यांच्या हातात बेड्या घातल्या गेल्या. व त्यांना एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. ते म्हणाले, अपहरणकर्त्यांनी अनेक व्हिडिओ बनवले, ज्यात हाय-कमिशनच्या कर्मचार्‍यांना आपला अपघात झाल्याचे कबूल करण्यास भाग पाडले. चौकशीदरम्यान त्यांना वारंवार अशी धमकी दिली जात होती की भविष्यात आपल्या आयुक्त, आणि हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांसोबत असेच केले जाईल. 
@@AUTHORINFO_V1@@