दिल्ली सरकार ४ हजार तबलिघींना घरी पाठवणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2020
Total Views |
Tablighi Jamat _1 &n

 


गुन्हे दाखल असलेल्यांना पोलीसांच्या ताब्यात देणार


नवी दिल्ली : निझामुद्दीन मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिघी जमातींची प्रकृती ठीक झाल्यानंतर आता घरी पाठवण्यात येणार आहे. दिल्ली सरकारने हा आदेश दिला असून ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री संत्येंद्र जैन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले जाणार असून उर्वरितांना घरी पाठवले जाईल.
 
 
 
तबलिघी जमातीच्या चार हजारांहून अधिक जणांना मार्च अखेरीस विविध ठिकाणांहून क्वारंटाईन केले होते. त्यातील एक हजारांहून अधिक जण हे कोरोनाबाधित आढळले होते. विविध क्वारंटाईन केंद्रात ठेवल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता बऱ्याच जणांचा क्वारंटाईन काळ संपला आहे, त्यांना आपापल्या घरी सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
 
 
 
तबलिघी जमातच्या निझामुद्दीन स्थित मरकज येथे झालेल्या कार्यक्रमामुळे कोरोना संक्रमणाचा हॉटस्पॉट बनला होता. इथे झालेल्या कार्यक्रमात देशविदेशांतील मौलवी, मुस्लीम धर्मगुरू उपस्थित होते. शेकडो देशांतून इथे तबलिघींची उपस्थिती होती. कार्यक्रम झाल्यानंतर तबलिघी आपापल्या ठिकाणी गेले त्यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला.



दिल्ली पोलीसांनी मरकजचा प्रमुख मौलाना साद याला प्रमुख आरोपी घोषित केले असून अन्य सहा जणांना आरोपी घोषित करत खटला दाखल केला आहे. क्राईम ब्रांचने मौलाना सादच्या मुलाची दोन तास चौकशी केली होती. या दरम्यान, त्याच्यासह असणाऱ्या लोकांची माहिती त्याच्याकडून घेण्यात आली. एकूण २० जणांची माहिती पोलीसांनी घेतली असून या सर्वांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे २० जण कार्यक्रमात येणाऱ्या जाणाऱ्यांची व्यवस्था पाहत होते. कार्यक्रमानंतर सर्वच्या सर्व बेपत्ता आहेत.
@@AUTHORINFO_V1@@