'रामायणा'चा जागतिक विक्रम !

    01-May-2020
Total Views | 53

ramayan_1  H x
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षत घेता देशात लॉकडाऊन दरम्यान सरकारने रामानंद सागर यांची रामायण ही मालिका दूरदर्शनवर पुनर्प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रसारणाच्या काही दिवसातच रामायण या मालिकेने जागतिक विक्रम केला आहे. राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनने याबाबत अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. या ट्विटनुसार, 'रामायणच्या पुनर्प्रसारणाने जगभरातील मालिकांच्या प्रेक्षकांचा रेकॉर्ड तोडला आहे. आणि १६एप्रिल रोजी तब्बल ७.७ कोटी दर्शकांसह रामायण हे जगातील सर्वाधिक पहिली जाणारी मनोरंजन मालिका ठरली आहे.'


देशभरातील लोक सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या घरामध्ये बंद आहेत. यामुळे सर्वच क्षेत्रे ठप्प आहेत. यात मनोरंजन क्षेत्रातील सर्व मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कोणत्याही मालिकेचे नवीन भाग टीव्हीवर प्रसारित होत नाहीत. १७मार्चपासूनच सर्व टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब मालिकेचे शूटिंग बंद झाले आहे. रामायण पुन्हा प्रसारित करावे अशी लोकांकडून बर्‍याच काळापासून मागणी होती. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने लॉकडाउन काळात रामायण पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.




रामायण आणि महाभारत यासारख्या पौराणिक मालिकांना प्रेक्षक पसंती दर्शवितात. या मालिकांचे भाग आणि प्रसंग सोशल मीडियावर दररोज चर्चेत असतात. रामायणच्या पुनर्प्रसारणाने पुन्हा एकदा अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लाहिरी आणि अरविंद त्रिवेदी या मालिकेतील मुख्य पात्रांना चर्चेत आणले आहे. लोकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे आणि प्रतिक्रियेमुळे ते खूप उत्साही आहेत. ज्या दिवशी रामायणचा पहिला भाग प्रसारित झाला त्या दिवशी १ कोटी ७० लाख लोकांनी पहिला. बनियाड, शक्तीमान, श्रीमान श्रीमती आणि देख भाई देख यासारख्या अन्य प्रसिद्ध मालिकादेखील टीआरपीच्या दृष्टीने चांगली कामगिरी करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121