मुंबई : फेसबुक टीमने आपल्या फेसबुक आणि मेसेंजर अॅप्स आणि वेब प्लॅटफॉर्मवर नवीन ईमोजी आणण्याचे जाहीर केले. यानंतर फेसबुककडून दोन नवीन इमोजी सादर करण्यात आल्या आहेत. यात फेसबुक अॅपमध्ये एक इमोजी हातात हार्टशेप घेऊन आहे आणि मेसेंजरसाठी जांभळ्या रंगाचे स्पंदन करणारे एक हार्टशेप इमोजी सादर करण्यात आले आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात एकमेकांप्रती असणारी काळजी व्यक्त करण्यासाठी हे इमोजी फेसबुकने प्रदर्शित केले आहे.
फेसबुक कंपनीच्या प्रवक्त्यांनी नमूद केले आहे की, या नवीन प्रतिक्रिया कोरोनाव्हायरसच्या संकटाशी लढत असणाऱ्यांप्रति आपुलकीची भावना व प्रेम व्यक्त करण्यासाठी फेसबुकने या प्रतिक्रिया अपडेट केल्या आहेत. आम्हाला अशा आहे की, या प्रतिक्रिया लोकांना #COVID19 संकटात लढा देणाऱ्यांना समर्थन दर्शविण्याचा एक अतिरिक्त मार्ग असेल.
तुम्हाला हा इमोजी मिळाला का ?
फेसबुक काही कालावधीत वापरकर्त्यांसाठी हा केअर इमोजी आणत आहे. बर्याच लोकांना या नवीन इमोजी आधीच प्राप्त झाल्या आहेत, तथापि, बहुतांश वापरकर्त्यांसाठी येत्या काही दिवसांत ते दिसू लागतील. वरील छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे दोन्ही इमोजी “थंब अप” च्या प्रतिक्रिया श्रेणीत आपल्या पेजवर उपलब्ध असेल तर इतर इमोजी प्रतिक्रियांच्या बाजूला दर्शविल्या जातील. म्हणूनच, फेसबुकवर या नवीन इमोजी कशा अपडेट होतील याबद्दल वापरकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही,कारण एकदा ते पूर्णतः अपडेट झाले जी आपल्या पेजवर आपोआपच दिसून येईल. मात्र, नवीन ईमोजी मिळविण्यासाठी आपले फेसबुक अॅप नियमित अद्ययावत केलेले असावे याची खात्री करणे आवश्यक आहे.