महा एमटीबीच्या वृत्ताची दखल : राज्यात पूलिंग चाचणी पद्धतीचा अवलंब होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

rajsh tope_1  H



एकाच वेळी ६४ जणांच्या चाचण्या करणारा ‘इस्रायल पॅटर्न’ ही बातमी महाएमटीबीने सर्वात प्रथम  गुरुवारी (ता.९) रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत राज्यातील चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यात 'पूलिंग किंवा ग्रुप चाचणी' पद्धतीचा अवलंब होणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

मुंबई
: राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता राज्यात जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या घेण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही म्हटले आहे. यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करण्याचा प्रयत्न म्हणून इस्रायलने ग्रुप चाचणी किवा पुलिंग पद्धतीचा अवलंब करत एकाच वेळी ६४ जणांच्या चाचण्या करणारा ‘इस्रायल पॅटर्न’ ही बातमी सर्वात प्रथम महाएमटीबीने गुरुवारी (ता.९) रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत राज्यातील चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यात पूलिंग किंवा ग्रुप चाचणी पद्धतीचा अवलंब होणार असलायचे आज पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 



आतापर्यंत जगभरातील अनेक देशांत कोरोनाची लक्षणे दिसत असलेले आणि कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीच कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र दरम्यानच्या काळात काही 'फॉल्स निगेटिव्ह' कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. 'फॉल्स निगेटिव्ह' रुग्ण म्हणजे ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरीही त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढू नये आणि अधिकाधिक लोकांची कोरोना चाचणी व्हावी, म्हणून इस्रायलने चाचणीची नवी पद्धत विकसित केली. यामध्ये एकाचवेळी अनेक लोकांच्या चाचण्या घेणे शक्य झाले आहे.







काय आहे चाचणी पद्धत ?

चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी इस्रायलच्या टेक्नियन विद्यापीठ आणि रॅम्बम हेल्थ केअर कॅम्पसने नवी पूलिंग पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीनुसार एकावेळी एका गटातील किंवा एका परिसरातील ३२ किंवा ६४ जणांचे नमुने एकत्रित करून त्यांची चाचणी केली जाईल. त्या ३२ किंवा ६४ जणांचा एकत्रित चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला तरच प्रत्येकाची स्वतंत्रपणे पुन्हा चाचणी केली जाईल. त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यास सर्वांचाच अहवाल निगेटीव्ह समजला जाईल. यापद्धतीचा फायदा हाच की प्रत्येक व्यक्तीच्या नमुन्यांची चाचणी करण्यापेक्षा ३२ किंवा ६४ जणांचे नमु्ने एकत्र करून त्यांचा चाचणी घेतल्यास प्रयोगशाळेचा तेवढा वेळ वाचेल आणि अधिकाधिक लोकांची चाचणी करणे शक्य होईल.


महाराष्ट्राला कशी होणार मदत ?

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक चाचण्या करणारे राज्य आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत ३३ हजार रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहे. म्हणून आता पुलिंग टेस्टिंग पद्धतीचा अवलंब करत राज्यातील चाचण्यांचा वेग अधिक वाढविण्यात येणार आहे. भारतासारख्या अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांसाठी ही चाचणी पद्धती नवीन पर्वणीच ठरू शकते. भारतातील आरोग्यसेवा, प्रयोगशाळांची संख्या व त्यावर येणारा ताण लक्षात घेता. चाचणीची ही पद्धती अधिक फायदेशीर ठरू शकते. यातून लवकरात लवकर कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांना अलगीकरण करण्यात मोठे यश मिळू शकते.
@@AUTHORINFO_V1@@