डोंबिवलीत पाच वर्षाच्या मुलाला कोरोना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2020
Total Views |

Dombivali_1  H


डोंबिवली पूर्व आणि कल्याण पूर्व कोरोनाचा हॉटस्पॉट

कल्याण : डोंबिवलीमध्ये ५ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी कल्याण डोंबिवलीत नवे ६ रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ झाली आहे. ज्यामध्ये एका ५ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. आज आढळलेल्या ६ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आणि १ रुग्ण कल्याण पूर्वेतील आहे.
 
 
आज सापडलेल्या नविन ६ रुग्णांमूळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४९ वर जाऊन पोहोचला असून त्यामध्ये डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक म्हणजे २५ रुग्णांचा समावेश असून त्यापाठोपाठ कल्याण पूर्वेत ९ रुग्ण असल्याने डोंबिवली पूर्व आणि कल्याण पूर्व हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. आजच्या रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेतील ५ वर्षीय मुलगा, २५ वर्षीय पुरुष,तर अनुक्रमे ५२, ३० आणि ३२ वर्षीय महिलांचा तर कल्याण पूर्वेतील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजपर्यंतचे एकुण रुग्‍ण ४९ असून यापैकी २ मयत, ९ डिसचार्ज (१ निळजे आरोग्‍य केद्रातील धरुन) तर एकुण ३८ रुग्ण उपचार घेत आहेत.
 

रुग्णांची वर्गवारी : डोंबिवली पूर्व – २५, कल्‍याण पूर्व – ९, कल्‍याण पश्चिम – ७, डोंबिवली पश्चिम – ७, टिटवाळा – १
@@AUTHORINFO_V1@@