कार्यक्रम दिल्लीत फैलाव देशभर ! आयोजक मौलानासह ६ जण ताब्यात

    01-Apr-2020
Total Views | 33

nizamuddin 6 arrested_1&n
नवी दिल्ली : जगभर कोरोनाचे वादळ उठले असताना दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. या कार्यक्रमामध्ये समावेश असलेल्या अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले असून काही जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, मौलाना साद हा २८ मार्चपासून पसार असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
दिल्लीतील निझामुद्दीन भागातमध्ये तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात देशभरातून जवळपास २ हजाराहून अधिकजण सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा तेलंगणात मृत्यू झाला. या सर्व घडामोडींनंतर केंद्र आणि राज्य सरकारांची झोपच उडाली. कारण देशातल्या अनेक भागांमध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती आढळून येत आहेत. महाराष्ट्रमधील अनेक लोकांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121