दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |


TABLIG E JAMAT_1 &nb



नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ परिसरातून शेकडोना कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक बाब समोर आली. तब्लिक ए जमातीच्या या धार्मिक सोहळ्यात देशातील व परदेशातील २ हजारहून अधिक लोक सहभागी झाले होते. हे ठिकाण देशभरातल्या कोरोना प्रादुर्भावाचे सगळ्यात मोठे केंद्र बनल्याचे दिसून आले. हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे.त्यानंतर हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला.



कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी २१३७ जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या २१३७ पैकी ३०३ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत
, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. यापैकी १२०३ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. १० राज्यात ८०० लोकांचा शोध सुरु आता सुरु आहे. यांच्या संपर्कातल्या आलेल्यांचे आकडे हजारात असू शकतात. जानेवारीपासून 2 हजार विदेशी तब्लिगी भारतात दाखल झाले होते, अशी देखील माहिती आहे.



महाराष्ट्रातून
मरकजसाठी गेलेल्यांचा शोध सुरु



महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मरकजमधील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत. औरंगाबादेत आतापर्यंत ४० जणांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान १३६ व्यक्ती आहेत
, जे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील १६ जण उपस्थित असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील १६ जणांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यामध्ये शहरी भागातील ६ तर ग्रामीण भागातील १० जणांचा समावेश आहे. चंद्रपूरच्या राजुरा शहरातही एक संशयित रुग्ण आढळला. निजामुद्दीनमधील कार्यक्रमातून हा व्यक्ती परतला आहे. सदर व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील १३ लोकांचा समावेश होता. अकोल्यातील ४ , बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यातील प्रत्येकी ३ जणांचा यामध्ये समावेश आहे. परभणीत देखील दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील जमातमध्ये गेलेले ३ जण परतले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@