निर्भायाच्या गुन्हेगारांना फाशी

    19-Mar-2020
Total Views |
nirbhaya_1  H x





नवी दिल्ली : दिल्लीतील थरकाप उडवणाऱ्या निर्भयावर केलेल्या बलात्काऱ्यांना अखेर तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तिहारमध्ये पहाटे साडेपाच वाजता त्यांना फाशीवर देण्यात आली. अखेर ७ वर्ष ३ महिन्यानंतर निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयाने रात्री १२च्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.


"शेवटी आमच्या मुलीला न्याय मिळाला. आज मी समाधानी आहे. कारण, संपूर्ण देशाला या घटनेनंतर शरमेने मान खाली घालावी लागली होती. आज संपूर्ण देशाला न्याय मिळाला आहे." अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे. १६ डिसेंबर २०१२ ला दिल्लीत संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. बलात्कार करुन या दोषींनी निर्भयावर शारिरीक अत्याचार ही केले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. अनेक निदर्शने झाली, गुन्हेगारांनी अनेक प्रकारे फाशीपासून पाळण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ७ वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला.

अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121