नवी मुंबईतील सीवूड्स येथे इमारतीला भीषण आग

    08-Feb-2020
Total Views |


saeawoods fire_1 &nb



नवी मुंबई : नेरूळ येथील सीवूड्स सेक्टर ४४ मधील सी होम्स या २१ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



आज सकाळी ७ च्या सुमारास नेरुळमधील सीवूड्स सेक्टर ४४ मधील सी होम्स या इमारतीच्या १८ व्या आणि १९ मजल्यावर आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र, ही आग मोठी असल्याने ती विझवणे जिकिरीचे धाले होते. इमारत गगनचुंबी असल्याने ही आग वेगाने पसरत होती. उंचीवरील आग विझवताना अनेक अडथळे येत असल्याने यात शर्थीचे प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे ७ जवान जखमी झाले. अखेर तीन तासांनंतर, म्हणजेच १०.३० वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.
आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेश अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पुढील वर्षी बांगलादेशात निवडणुका होणार असल्याची घोषणा केली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पदच्यूत केल्यानंतर जेव्हा मोहम्मद युनूस सत्तेत आले, तेव्हा अंतरिम सरकारला विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आजही तो कायम आहे. दुसरीकडे, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि सैन्य यांच्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सर्व सार्वजनिक सभा, मिरवणुका आणि रॅलींवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. युनूस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121