रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |

balasaheb dikshit_1 
 
 
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि वनवासी कल्याण आश्रमाचे पुर्व संघटन मंत्री बाळासाहेब दीक्षित यांचे सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास नाशिकमधील श्रीगुरुजी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. नाशिक अमरधाम येथे सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
 
बाळासाहेब दीक्षित यांचा अल्पपरिचय
 
 
दीक्षित हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात ज्येष्ठ प्रचारक होते. ६६पेक्षा अधिक वर्षांपासून ते संघ प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. १९७८ साली महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य सुरू झाल्यानंतर या कार्याची सुरुवात व संपूर्ण महाराष्ट्रात या कार्याचा विस्तार करण्यात बाळासाहेब दीक्षित यांचे योगदान खूप मोठे मानले जाते. १९५८पासून १५ वर्षे तेथे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघ विचार रुजवले. १९९२ मध्ये लातूर येथे झालेल्या भूकंपानंतर किल्लारी येथे पुनर्वसन कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
@@AUTHORINFO_V1@@