मुंबादेवीचा कोरोना रक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

atul shah_1  H



मुंबादेवीवरून मुंबई शहराचे नामकरण झाले. व्यापारी आणि कामगारांनी प्रसिद्ध असलेल्या मुंबादेवी परिसरालाही कोरोनाचा विळखा बसला. अशा परिस्थितीत खचून न जाता, येथील नगरसेवक अतुल शहा खंबीरपणे उभे राहिले. कोरोनामुळे त्रासलेल्या व्यक्तींना त्यांनी धीर दिला. मदत केली. गरजूंना आसरा दिला. त्यांचे हे सेवाकार्य आजही अविरतपणे सुरु आहे. तेव्हा, त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा...

अतुल शहा
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक
प्रभाग क्र. : २२०
कार्यक्षेत्र : मुंबादेवी
संपर्क क्र. : ९८२०१४५४९६


कोरोनासारख्या वैश्विक महामारीच्या बिकट परिस्थितीत आपला जीव मुठीत धरून मुंबादेवी विधानसभेतील भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या मदतीसाठी जीवाचे रान केले. मदतकार्य करताना बर्‍याच कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली, तरीही जीवाची पर्वा न करता, सर्व कार्यकर्त्यांनी मदतकार्य सुरू ठेवले. यामधीलच एक हाडाचा कार्यकर्ता म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल शहा. पक्षामधील विविध पदांचा दांडगा अनुभव असलेल्या शहा यांनी कोरोना काळात आपल्या वयाचा विचार न करता, रस्त्यावर उतरून गरजूंची मदत केली. वैद्यकीय मदतीवर भर दिला. आपल्या २२० क्रमांकाच्या वॉर्डमध्ये विविध उपाययोजना राबवून लोकांची समस्यांमधून सुटका तर केलीच, शिवाय कोरोनाही आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.



कोरोनाचे वाढणारे संकट पाहून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला. ‘लॉकडाऊन’मुळे जनजीवन हे जागच्या जागी थांबले. हातावर पोट असणार्‍या लोकांची परवड सुरू झाली. आरोग्य आणि वैद्यकीयविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या. अशावेळी लोकांना आपल्या गल्लीपर्यंत धावत येणार्‍या नगरसेवकांची गरज होती. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील काही नगरसेवक कोरोनाच्या भीतीने चार भिंतीत कैद झाले, तर काही नगरसेवक आपल्या जीवाची आणि वयाची पर्वा न करता लोकांसाठी झटत राहिले. अशा झटणार्‍या नगरसेवकांमधीलच एक नाव म्हणजे अतुल शहा. मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. २२० चे शहा हे प्रतिनिधित्व करतात. मुंबादेवी परिसर हा तसा बाजारपेठा आणि सातत्याने व्यापार्‍यांनी गजबजलेला भाग. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या हातगाडी वाहक, पेंटर, सुतार, पाटीवाला अशा कामगारांची संख्या या परिसरात अधिक. ‘लॉकडाऊन’ची पहिली झळ खर्‍या अर्थाने या कामगारवर्गाला बसली.


अशा बिकट परिस्थितीत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम शहा यांनी केले. लोकांची भूक भागविण्यासाठी ‘फिड द निडी’ अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून रंजल्या-गांजल्या, कोणताही आधार नसलेल्या लोकांच्या पोटाची खळगी भरण्यात आली. त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय करण्यात आली. या अभियानाचा फायदा जवळपास आठ ते दहा हजार लोकांना झाला. मुंबादेवी विधानसभाक्षेत्रात जवळपास २० हजार ४०० जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. विभागातील कोरोनाचे रुग्ण सापडत असताना ते वास्तव्यास असलेल्या संपूर्ण इमारतीला सीलबंद करावे लागत होते. अशावेळी इमारतीत राहणार्‍या इतर रहिवाशांना बर्‍याच समस्यांना समोरे जावे लागत होते. यामधील एक समस्या म्हणजे, दैनंदिन अन्नधान्य उपलब्धतेची. या समस्येवर मात करण्यासाठी शहा यांनी विभागातील सीलबंद केलेल्या इमारतींसाठी विशेष रेशन पाकिटे तयार केली. सोबतच विभागातील सर्वसामान्य नागरिकांमध्येही या पाकिटांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून जवळपास १० ते १२ हजार लोकांच्या रेशनची गरज पूर्ण करण्यात आली. राजकारण आणि समाजकारण क्षेत्रात आल्यापासून शहा यांचा आरोग्य विषयक कामांकडे कल आहे. याचा उपयोग त्यांना कोरोनाच्या काळात झाला. त्यांनी प्रथमोपचार पेटीमध्ये इतर वैद्यकीय साधनांबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरची भर घालून त्यांचे लोकांमध्ये वाटप केले. साधारण एक हजार ८०० पेट्या लोकांमध्ये वाटण्यात आल्या. याशिवाय स्वतंत्रपणे मास्क, सॅनिटायझर सोबतच डिजिटल थर्मामीटरचे वाटप करण्यात आले. मुंबई विधानसभा क्षेत्रात एकूण १२ हजार मास्क लोकांना दिले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या धोका लक्षात घेऊन शहा यांनी महापालिका प्रशासनासोबत आरोग्य केंद्रांसाठी पाठपुरावा केला. महापालिकेच्या माध्यमातून विभागात कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आली, तसेच आरोग्य केंद्रांचेही नियोजन करण्यात आले. ही सगळी कामे करण्यासाठी आर्थिक बाजूही भक्कम असणे गरजेचे होते. त्यासाठी नगरसेवक निधीबरोबरच स्पॉन्सरशिपच्या माध्यमातूनही आर्थिक बाजूचे संतुलन शहा यांनी सांभाळले.


atul shah_1  H



‘प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष आणि तृतीय स्वत:’ या पक्षाच्या तत्त्वानुसारच गेल्या कित्येक वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय आहे. पक्षाची निष्ठा बाळगूनच मी जनहिताचे काम करत आहे. ‘कोविड’काळातही मी याच मार्गाने पक्षाचे काम केले. या कामासाठी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांमधून मला स्फूर्ती मिळाली आहे.


‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता आल्यावर शहा पायाला भिंगरी लावल्यासारखे विभागात फिरू लागले. मुंबादेवी विभागात कामगारांची संख्या अधिक असल्याने त्यांना आपल्या मायदेशी परतण्यामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. अशावेळी कामगारांचे पोलिसांसोबत समन्वय साधून देण्याचे काम शहा यांनी करून दिले. रस्त्याने प्रवास करणार्‍या लोकांना आवश्यक वस्तू पोहोचविण्यात आले. श्रमिक ट्रेन आणि बसेसमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना भोजन आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. गांधी जयंतीनिमित्त शहा यांनी विभागात ‘आत्मनिर्भर बाजार’चे आयोजन केले होते. या माध्यमातून गरजू भाजीविक्रेत्यांना रोजगार मिळविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. सोबतच नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला. गणेशोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता, विभागामध्येच त्यांनी गणेशभक्तांसाठी गणेशमूर्ती विसर्जनाची सोय करून दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवासप्ताहही शहा यांनी वैद्यकीय विषयक उपक्रम राबवूनच साजरा केला. विभागातील शारीरिक अपंगत्व आलेल्या व्यक्तींना वॉकर आणि वॉकिंग स्टीक देण्यात आले. गरजवंत लोकांना कुकींग गॅसचे वाटप करण्यात आले. शिवाय, विभागातील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या लोकांसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे काम त्यांनी केले. ‘कोविड’काळात राज्य सरकारच्या चुकलेल्या धोरणांविरोधात आवाज उठविणेही आवश्यक होते. अशा वेळी शहा हे मुंबादेवी विधानसभा क्षेत्राचा आवाज बनले. वाढीव वीजबिलांबरोबरच राज्य सरकारच्या कोरोनाकाळातील चुकीच्या निर्णयांविरोधात शहा आपल्या कार्यकर्त्यांसमवेत रस्त्यावर उतरले. पक्षामध्ये वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असूनही शहा खर्‍या अर्थाने कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. जनसेवेसाठी रस्त्यावर उतरले. विभागातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला. या सगळ्या कामांसाठी त्यांना मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्याची साथ मिळाली. मुंबईत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक ‘कोविड’काळात जनहितास फायदेशीर ठरले. त्यामध्ये अतुल शहा हे एक नाव ठरले आहे.
@@AUTHORINFO_V1@@