सेवा हेच कर्तव्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

jyoti kalamkar_1 &nb


कोरोना आणि ‘लॉकडाऊन’काळात कामगार, गरीब तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांणच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या भाजपच्या नगरसेविका ज्योती गणेश कळमकर. प्रभाग क्रमांक ९-ब मध्ये ठिकठिकाणी माणुसकीच्या नात्याने त्यांनी मदतकार्य केले. जेवणाचे डबे, मोफत शिधावाटप तसेच सॅनिटायझर वाटप, रक्तदान, औषध वितरण अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी गरजूंना मदत केली. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...


ज्योती गणेश कळमकर
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेविकाप्रभाग क्र. : ९-ब बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी
संपर्क क्र. : ९८२२४३५०१४



कोरोना नावाचा विषाणू भारतात पोहोचला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वत्र ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. त्यामुळे एकच धांदल उडाली. सर्वसामान्यांना आहे त्या ठिकाणी थांबावे लागले. पुढे काय? असा सर्वसामान्य जनतेपुढे प्रश्न उभा राहिला. त्याचबरोबर खायचे काय, हाही प्रश्न होताच. त्यावेळी प्रथम कळमकर यांनी ‘लॉकडाऊन’च्या दुसर्यातच दिवशी सफाई कामगारांची मनपा आयुक्तांच्या मदतीने ओळखपत्र बनवून घेतली. कारण, सफाई कर्मचार्यांिवर साफसफाईच्या जबाबदारीपासून ते अनेक जबाबदार्याी त्यांच्यावर होत्या, त्यामुळे कळमकर यांनी त्यांचे ओळखपत्र बनवून घेण्याचे प्रथम काम केले. ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर रोजंदारीवर काम करणार्याक लोकांना रोजच्या जेवणाची भ्रांत पडू लागली होती. अशा वेळी कळमकर यांनी गरजूंना रोज ६० दिवस जेवणाचे डबे उपलब्ध करून दिले. जवळपास २१ हजार डबे या काळामध्ये त्यांनी सर्वसामान्यांना पोहोचविले. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भूक भागेल व चांगले अन्न पोटात जाईल, हा त्यामागे त्यांचा विचार होता. तसेच अन्नधान्यवाटपही कळमकर यांनी केले. यामध्ये त्यांनी ३,२०० लोकांना शिधावाटप केले. प्रभागांमध्ये कोणीही अन्नावाचून राहू नये आणि प्रत्येकाला अन्न मिळावे, हा त्यामागे प्रामाणिक विचार होता.


ज्योती कळमकर यांनी आपल्या प्रभागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना तसेच सफाई कामगारांना दोन हजारांपेक्षा जास्त सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप केले आणि प्रत्येकाला त्याचे महत्त्वही पटवून दिले. तसेच जवळपास २२५ सोसायट्यांमध्ये सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सोसायटीतल्या प्रत्येकाला कोरोनाविषयी जनजागृती करून आपल्या जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.ज्योती कळमकर यांचे पती गणेश कळमकर यांची याकामी त्यांना मोलाची साथ लाभली. प्रभागामध्ये कोणत्या व्यक्तीला अडचण उभी राहिली, तर ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. प्रभाग ९ मधील औषधे, दूध, भाजी, किराणाविक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून कळमकर यांनी पासवाटपही केले आणि त्यांच्याकडे खरेदीला येणार्याअ प्रत्येक माणसाला ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्याची विनंतीही केली. ज्योती कळमकर यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्यांचे वाटप केले. याला ‘बूस्टर डोस’ असेही नाव देण्यात आले. जवळपास पाच हजार कुटुंबांना कोरोनाकाळामध्ये ३० हजार गोळ्यांचे वाटप केले. प्रभागातल्या सोसायटी, वस्ती भागांमध्ये जंतुनाशक फवारणीही यावेळी केली.


jyoti kalamkar_1 &nb


समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मी व माझे पती गणेश कळमकर सर्वसामान्यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहू आणि काम करू. सामान्य लोकांचा विश्वास आणि प्रेम, आशीर्वाद हेच आमचे काम करण्यासाठीचे बळ आहे. सर्वसामान्य जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आणि समाजाप्रतिची सेवा देण्यासाठी आम्ही कायम तत्पर असू.



प्रभाग क्रमांक ९ मध्ये कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संख्येने दीड हजारांचा टप्पा ओलांडला. त्या प्रत्येक रुग्णाला आयुर्वेदिक काढा देऊन त्यांना मानसिक उभारी देण्यासाठी कळमकर यांनी विशेष प्रयत्न केले.त्यांच्या कुटुंबीयांना लागेल ती मदत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचविली. या काळात रक्ताचा तुटवडा महाराष्ट्रात जाणवत होता. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करून कळमकर यांनी गरजेनुसार रक्तसाठा उपलब्ध करुन दिला. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ७७ लोकांनी रक्तदान केले. आपण समाजाचे देणे लागतो आणि आपले प्रथम काम हे सर्वसामान्यांना सेवा देणे आहे, हे लक्षात ठेवून आम्ही एकूणच मदतकार्याची अंमलबजावणी केल्याचे ज्योती कळमकर सांगतात. कोरोनाकाळात सामान्य जनता घरामध्ये बसून होती. बाहेर पडले तर पोलीस आणि कोरोनाची टांगती तलवार. या अवस्थेमध्ये असताना सर्वसामान्यांना रोजच्या दैनंदिन जेवणामध्ये भाजी हवी. यासाठी सर्व सोसायट्यांमध्ये सहा टेम्पो भरून भाजीपाला कळमकर यांनी घरपोच पुरविला. वयस्कर लोकांना औषधाची गरज असते. त्यांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरपोच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. जर कोणाला कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास त्याची त्वरित टेस्ट करून योग्य ती औषधे दिली जात. जवळपास १,६०० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांना, रिक्षाचालकांना, पोलिसांना जवळपास एकूण दहा हजार मास्कचे वाटप कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कोरोनाकाळामध्ये अत्यावश्यक सेवा बजावणारे अनेक कर्मचारी रात्रंदिवस झटत होते. अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. हार व सोलापुरी चादर देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. जवळपास २,५०० कुटुंबीयांना चादरींचे वाटप करण्यात आले. ज्या नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशांची तब्येत चांगली राहावी, यासाठी फळवाटपही करण्यात आले. कोरोना होऊन बरे झालेल्या रुग्णांना मानसिक उभारी मिळावी म्हणून त्यांचे स्वागतही करण्यात आले.


ज्योती कळमकर यांच्या प्रभागामध्ये अनेक मिठाईची दुकाने आहेत.‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये ही दुकानेदेखील बंद होती. पण, या दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणात चॉकलेटचा साठा उपलब्ध होता. ती चॉकलेट्स दुकानदारांकडून कळमकर यांनी विकत घेतली आणि प्रभागातील प्रत्येक घरामध्ये लहान मुलांना चॉकलेट वाटप करुन त्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे महत्त्व पटवून सांगितले आणि अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.कळमकर सांगतात की, “कोरोनाव्यतिरिक्त अनेक उपक्रम आमच्या प्रभागामध्ये राबविले. नुकताच राम मंदिर पायाभरणीचा मुख्य समारंभ पार पडलेला असतानाच, प्रभाग क्रमांक ‘९ ब’मध्ये दीपोत्सव साजरा करून एक प्रकारे दिवाळी साजरी केली गेली.” नगरसेविका ज्योती कळमकर यांचे पती गणेश कळमकर आपली सामाजिक सेवा, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी देत आहेत, याचे समाधान त्यांना नक्कीच आहे.या सर्व मदतकार्यामध्ये सतीश बागल, लखन कळमकर, श्रीकांत जाधव, अनिल कळमकर, आनंद पंडित, संदीप कळमकर या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून सर्व कामांमध्ये आपला सहभाग नोंदवून समाजाप्रतिची सेवा दिली. या सर्व सेवेला चंद्रकांतदादा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@