विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने
मुंबई: भारतीय जनता पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा व भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या गाड्यांवर पश्चिम बंगाल येथे करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी जाहीर निदर्शने केली. प्रसाद लाड व त्यांच्या समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
२०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे.पी.नड्डा सध्या पश्चिम बंगालमध्ये होते. त्याठिकाणी ते पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याबरोबरच नागरिकांशी संवाद साधत होते. अशातच त्यांचा दौऱ्यावर हिंसक वळण मिळाले. नड्डांसोबत कैलाश विजयवर्गीय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषसुद्धा होते. सिराकोल परिसरातील दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.
कैलाश विजयवर्गीय यांनी टि्व्टरवर एक व्हिडीओ टाकून माहिती दिली. "बंगाल पोलिसांना नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस त्यांची सुरक्षा करण्यामध्ये अपयशी ठरले. याआधी दिलीप घोष यांनी बुधवारी जे पी नड्डा उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता.