मुंबई : 'उद्या धमाका' असे लिहीत शिवसेना खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलखातील प्रोमो शेअर केला.महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'अभिनंदन मुलाखत' सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही, अशा लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगू च्या फालतू गप्पा, असे म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये नेमके काय असणार, मुख्यमंत्री नेमके काय बोलणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना संजय राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.