“हे सरकार फक्त फेसबुकवरून घोषणा करते, प्रत्यक्षात काहीच नाही”

    04-Oct-2020
Total Views | 22

Sandeep deshpande_1 
 
 
 
मुंबई : ठाकरे सरकारने नुकतेच अनलॉक ५ ची नियमावली जाहीर केली. यामध्ये त्यांनी काही अटींसह हॉटेल्स आणि बार उघडण्यासाठी परवानगी दिली. मात्र, अद्याप सामन्यांसाठी लोकलसेवा चालू करणायत आलेली नाही. यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका करत, “हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारे आहे, प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचा विचार ठाकरे सरकार करतेय का?” असा प्रश्न विचारला आहे.
 
 
 
“तुम्ही रेस्टॉरंट-बारसह एक-एक आस्थापना सुरु करताय, पण त्यासाठी लोकांनी कामावर जायचे कसे? त्या प्रश्नाचे उत्तर सरकार देत नाही. नुसती घोषणा केली की, १५ ऑक्टोबरपासून लोकल सेवा सुरु करण्यासाठी विचाराधीन आहोत. त्यासाठी विचार करावा लागतो. विचार करण्याचे धाडस सरकरमध्ये नाही. न्यायालयाने कान टोचले तरी यांना बुद्धी सुचत नाही. स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचे असा ठाकरे सरकारचा विचार आहे का?, असा प्रश्न पडणारच.” अशी टीका संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121