दिल्लीत हायअलर्ट ; आतंकवादी लपले असण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


delhi ncr_1  H



नवी दिल्ली : दिल्ली आणि एनसीआरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर मोठा घातपात होण्याची शक्यता असल्याने दिल्ली व एनसीआर मध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या हल्य्यात पोलीस अधिकाऱ्यांनाही लक्ष केले जाऊ शकते. सध्या अटकेत असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारांनी अलीकडेच एका पोलीस ठाण्यात घुसून उपनिरीक्षकाची हत्या केली होती. आता दिल्ली हे त्यांचे पुढील लक्ष्य आहे, अशी माहिती उघड झाली आहे.

ख्वाजा मोइनुद्दीन, सैयद अली नवाज आणि अब्दुल समद उर्फ नूर अशी पकडल्या गेलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तिघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांना दिल्लीत घातपात घडवण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी चौकशीत दिली आहे. त्यांना 'टार्गेट' देण्यात येणार होते. कधी, काय करायचं हे विदेशी हस्तक ठरवत असल्याची माहितीही त्यांनी चौकशीतून दिली.



पाकिस्तान ४० रोहिंग्यांना दहशतवादी प्रशिक्षण देत आहे
, इसिसद्वारे घुसखोरीस मदत

पाकिस्तान रोहिंग्या मुस्लिमांना दहशतवादाचे प्रशिक्षण देऊन बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरीची तयारी करत आहे. बांगलादेशी गुप्तचर यंत्रणेने सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांना इशारा दिला आहे की येत्या वर्षांत ४० रोहिंग्या मुस्लिम दहशतवादी मोठ्या प्रमाणात विनाश करण्याच्या उद्देशाने भारतात घुसू शकतात. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून जमात-उल-मुजाहिद्दीन ऑफ बांग्लादेश (जेएमबी) च्या माध्यमातून ढाकाच्या कॉक्स बाजारात परिसरात राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना दहशतवादी प्रशिक्षण देण्यात मदत केली जात आहे. यासाठी जेएमबीला आयएसआय कडून एक कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे वृत्त आहे. आयएसआय जमात-उल मुजाहिद्दीनला सौदी अरेबिया आणि मलेशियामार्फत हप्त्यांमध्ये पैसे देत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. पहिला हप्ता म्हणून जमातला एक कोटी प्राप्त झाले आहे. नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीलाही ही माहिती देण्यात आली आहे.


आयएसआयच्या या प्रयत्नामुळे आणि रोहिंग्या मुस्लिमांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याने बांगलादेशच्या सुरक्षेस मोठा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या कॉक्सबाजार व इतर रोहिंग्या निर्वासित छावण्याच्या परिसरातील निर्बंध आणखी कडक होऊ शकतात
. यामुळे दक्षिण आशियाई प्रदेशांत शांतता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि अशा परिस्थितीत बांगलादेश रोहिंग्या निर्वासितांना माघारी घेण्यासाठी म्यानमारवर आणखी दबाव आणू शकेल.

@@AUTHORINFO_V1@@