दिग्गी नावाचे पात्र

    05-Sep-2019   
Total Views | 55




तर ते पात्र कसले? 2019 ला पुन्हा कमळच आल्याने या पात्राला आगच लागली आहे. त्या आगीचे स्वरूप धूर आणि जाळ सोबतच असे. त्यामुळे वाट्टेल ते बरळत हे पात्र जनतेसमोर बिनपैशाचे मनोरंजन करत आहे. पात्र तसे चलाख आहे. आपली किंमत शून्य आहे. मात्र, रा. स्व. संघाबाबत काहीही बोललो तर लोक दखल घेतात, हे त्याने हेरले आहे. त्यानुसार हे पात्र रा. स्व. संघाच्या नावाचा मंत्र जपत आहे. शेवटी काय पात्रांनाही द्वेषाने का होईना, रा. स्व. संघाचे नाव घ्यावेच लागते


‘म्हातारा इतुका न पाऊणशे वयमान’ असूनही, ‘अभी तो मैं जवान हूँ’ म्हणत नेहमीच प्रत्येक गोष्टीत आपले हास्यास्पद मत मांडणारे कोण आहे? ज्यांना स्वतःच्या पक्षातील महिला कार्यकर्ता ‘सौ टका टंच माल’ वाटली होती आणि दहशतवादी ओसामाला ‘ओसामाजी’ असे आदराने म्हणावेसे वाटले तेच ते. मागे ते म्हणाले होते की, “जितेंद्र आव्हाड म्हणजे महाराष्ट्रातला मी.” तसेच भोपाळमधला मी म्हणजे मध्य प्रदेशचे जितेंद्र आव्हाड होय. थोडक्यात, जितेंद्र आव्हाडांना धाकटा बंधू मानणार्‍या या मोठ्या दादाची थेरं आव्हाडांना मागे टाकणारीच आहेत, यात शंका नाही.


असो
. तर ती व्यक्ती राजकारणातली पात्र म्हणावे असे नामांकित पात्र आहेत. (काही उलटसुलट मूर्खासारखे केले की काही ठिकाणी पात्रच आहेत, असे अजूनही म्हणतात, तर ते पात्र बरं का!) या पात्राच्या गळक्या तोंडातून अविरत घाण सांडत असते. देशभक्त, समाजप्रेमी काही घटना घडल्या की, या पात्राला संशय येतो. उदाहरणार्थ, पाक अतिरेक्यांनी पुलवामा हल्ला केला. त्यावेळी पात्राला ती दुर्घटना वाटली. मात्र, त्यावर भारत सरकारने लष्कराच्या जोरावर सर्जिकल स्ट्राईक केला तर त्यांना सर्जिकल स्ट्राईक संशयास्पद वाटते. आताही त्यांनी अकलेचे तारे तोडलेत. त्यांचे म्हणणे, पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करताना जितके लोक सापडले आहेत, ते लोक बजरंग दल, भाजप आणि आयएसआयकडून पैसे घेत आहेत. आयएसआयसाठी गुप्तहेरी मुसलमान कमी करतात आणि बिगर-मुसलमान जास्त करतात. आपण जसे असतो तसेच जग दिसते. त्यामुळे हिंदू परिवारात जन्म घेऊनही वैचारिक सुंता केलेल्या भारीच पुरोगामी असलेल्या या पात्राला असेच वाटणार. गेल्या निवडणुकीमध्ये या पात्राची पत्रास जनतेने अजिबात ठेवली नव्हती. पण तेवढ्याने बधेल तर ते पात्र कसले? 2019 ला पुन्हा कमळच आल्याने या पात्राला आगच लागली आहे. त्या आगीचे स्वरूप धूर आणि जाळ सोबतच असे. त्यामुळे वाट्टेल ते बरळत हे पात्र जनतेसमोर बिनपैशाचे मनोरंजन करत आहे. पात्र तसे चलाख आहे. आपली किंमत शून्य आहे. मात्र, रा. स्व. संघाबाबत काहीही बोललो तर लोक दखल घेतात, हे त्याने हेरले आहे. त्यानुसार हे पात्र रा. स्व. संघाच्या नावाचा मंत्र जपत आहे. शेवटी काय पात्रांनाही द्वेषाने का होईना, रा. स्व. संघाचे नाव घ्यावेच लागते. म्हणतात ना संघे शक्ति कलियुगे...



जाहिराती वैर्‍याच्या आहेत
?


बोलणार्‍याची माती विकते आणि न बोलणार्‍याचे सोनेही पडिक राहते म्हणतात
. एखाद्या गोष्टीबद्दल सकारात्मकता मांडून बाजारात पत वाढवण्यासाठी जाहिरातींचा उपयोग होत असतो, असे म्हटले जाते. पण काही काही जाहिराती पाहिल्या की, अक्षरशः वाटते की, या जाहिराती व भारतीय संस्कृती, समाजजीवन, धर्मकारण त्यातही हिंदू समाजपद्धतीवर आसूड ओढण्यासाठी केलेली एक अत्यंत नियंत्रित चक्रव्यूह आहे. या जाहिरातींमध्ये वस्तू नगण्यच असतात, मात्र जाहिरातींद्वारे उठून दिसते, ती या जाहिरातींमध्ये दाखवलेली हिंदू समाजात नावालाही नसणारी असहिष्णूता. हिंदू समाजातील व्यक्ती अत्यंत रूढीवादी, असहिष्णू आहे, त्यातच लालची आणि मूर्खही आहेत, असेच काही काही जाहिरातींमधून दाखवले जाते.


मात्र, लोक आता शहाणे झाले आहेत. असो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेड लेबलच्या चहाची जाहिरात. ही जाहिरात पाहून वाटतेच की बुत म्हणजे मूर्तीपूजा अशुभ काफीर आहे, असे सर्वसामान्य मुस्लिमांचे म्हणणे असताना (अपवाद वगळून) हा गणेश मूर्तिकार मात्र मुस्लीम असून शांत, सहिष्णू, समजूतदार, कलाप्रेमी आहे. मात्र, त्याचवेळी गणेशमूर्ती घ्यायला आलेला हिंदू मूर्ख, असहिष्णू कर्मठ दुष्ट. बरं, या हिंदूला मुस्लीम मूर्तिकाराकडून मूर्ती घ्यावीशी का वाटते तर फुकट मिळालेला चहा पिऊन? ही जाहिरात सर्वसमावेशक सहिष्णू हिंदुत्वाची प्रतिमा भंजन करते. पण याआधीही अशा जाहिराती आल्याच होत्या. हिंदू समाज, हिंदू मन उत्सवप्रिय आहे. या उत्सवप्रिय मानसिकतेचा फायदा घेत मग हिंदू समाजात हलकेच काही प्रतिमान पेरण्याचा उद्योग अशा जाहिरातींमधून केला जातो. हिंदू बालिका आणि मुस्लीम बालकाभोवती गुंफलेली रंगोत्सवानिमित्तची सर्फ एक्सेलचीरंग लाये संग’ची जाहिरातही अशीच. नवरात्री हा स्त्री शक्तीच्या दैवत्वाचा उत्सव. मात्र, मागे एकदा नवरात्र निमित्ताने सनी लिओनीची कंडोमची जाहिरात झळकली होती. त्यात सनी लिओनी आवाहन करत, “आ नवरात्री, ए रामो परंतु प्रेमथी म्हणजे या नवरात्रीला खेळा पण प्रेमाने.” हे जे सगळे आहे, ते इतके सरळ आहे का? नाहीच. या सार्‍यांमधून हिंदू संस्कृती, हिंदू जीवनपद्धती यावर पद्धतशीरपणे विकृत आघात केला जातो. ठराविक जाहिराती वैर्‍याच्या आहेत.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121