'बेस्ट' कर्जमुक्तीच्या दिशेने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |
 
 

११३६.३१ कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी

 

मुंबई : कामगारांचा स्थगित झालेला संप ही 'बेस्ट' प्रशासनाच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची बाब असतानाच बुधवारीच स्थायी समितीने महापालिकेतर्फे देण्यात येणार्‍या ११३६.३१ कोटींच्या निधीला मंजुरी दिली. ही निधी बिनव्याजी असून 'बेस्ट'ची कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

 

उत्पन्नात होणारा प्रचंड तोटा आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबून 'बेस्ट' उपक्रम डबघाईला आलेले आहे. कर्जाचा बोजा आणि दररोज होणार्‍या तोट्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या 'बेस्ट'ला पालिकेने महिनाभरापूर्वीच ६०० कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

 

या मदतीतून कामगारांची देणी भागवण्यात येणार आहेत. तर आता मंजुरी मिळालेली रक्कम कर्ज भागविण्यासाठी आहे. सध्या 'बेस्ट'वर सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज असून त्यावरील हप्ता व व्याजापोटी दर महिन्याला २०० कोटी 'बेस्ट'ला द्यावे लागते. त्यामुळे हा कर्जाचा भार कमी करण्यासाठी पालिकेने पुन्हा ११३६.३१ कोटी रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

 
 
@@AUTHORINFO_V1@@