पाककडून 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |





नवी दिल्ली
: 'कलम ३७०' रद्द केल्यापासून पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. अशातच पंतप्रधान इमरान खान यांच्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पाकिस्तानची कोंडी करण्यात येत आहे. विरोधकांकडून 'काश्मीर सोडा पीओके वाचवा' अशी नारेबाजी केली जात आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईला गेली आहे. अशातच पाकिस्तान भारताला वारंवार युद्धाच्या पोकळ धमक्या देत आहे. आता भारतासह संपूर्ण जगाचे आपल्याकडे लक्ष वेधले जावे, या हेतूने पाकिस्तानने 'गझनवी' बॅलिस्टिक या वारंवार चाचण्या केलेल्या क्षेपणास्त्राची काल रात्री पुन्हा चाचणी केली.

 


हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. जवळपास २९० किलोमीटर अंतरापर्यंत हे क्षेपणास्त्र मारा करते. या क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठीच पाकिस्तानने कराचीचा हवाई मार्ग बंद ठेवला होता. पाकिस्तानी लष्कर प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी दिलेल्या माहितीनुसार
, पाकिस्तानातील कराचीजवळ सोनमियानी प्रक्षेपण चाचणी केंद्रावरून 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ही चाचणी रात्रीच्या वेळेस करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही सैन्याचे या चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे.




या कृतीतून पाकिस्तान भारताला युद्धाचा इशारा देण्याचा प्रयत्न करत आहे. 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर आता  पाकव्याप्त काश्मीरही आपल्या हातातून जाते की  काय, असे पाकिस्तानला वाटते आहे. त्यामुळे इमरान खान सरकारमधील नेते वारंवार भारताला आमच्या नादी लागू नका
 नाहीतर युद्ध करू, असे इशारे देत आहे. काल तर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी युद्धाची तारीखदेखील जाहीर केली. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असून मी नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारे द्यायला इथे आलो आहे, असे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे. परंतु, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यामुळे सीमारेषेवरील तणावात आणखी भर पडणार आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@