एनडीटीव्ही माध्यमसमूहाच्या रॉय दाम्पत्याविरोधात आरोपपत्र दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |


नवी दिल्ली : सीबीआयने एनडीटीव्ही माध्यम समूहाचे संस्थापक प्रणव रॉय व त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांच्यावर थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबरोबरच या माध्यम समूहाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमादित्य चंद्र यांच्यावर ही गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर असाही आरोप ठेवण्यात आला आहे की, कंपनीने परकीय निधी भारतात आणण्यासाठी कर वाचवणाऱ्या देशांत ३२ उपकंपन्या स्थापन केल्या आहेत.
 
 
९ ऑगस्ट रोजी प्रणव रॉय व त्यांची पत्नी राधिका रॉय यांना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडविण्यात आले होते. सीबीआयच्या सूचनेनुसार त्यांच्या परदेशात जाण्यापासून थांबविण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या ४८ कोटींच्या कर्जव्यवहारात घोटाळा केल्याच्या प्रकरणावरून रॉय दाम्पत्यावर सीबीआयने २०१७ मध्ये प्रकरण दाखल केले होते. सीबीआयने दाखल केलेले एफआयआर प्रकरण सध्या दिल्ली उच्च न्यायालयात आहे.
@@AUTHORINFO_V1@@