दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणाऱ्या या प्रस्तावित कोस्टल रोडसाठी समुद्रालगत मोठा भराव टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशी, सामाजिक कार्यकर्ते व मच्छीमारांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असून रोजगारांवर गदा येणार असल्याचे सांगत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकल्पाला मिळालेल्या सीआरझेडच्या परवानग्या रद्द केल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने स्थगिती उठवण्यास नकार दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat