विरोधकांनी आकड्यांची चिंता सोडावी, बळकट लोकशाहीसाठी तुमचे मत महत्वाचे : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : संसदेत लोकसभा निवडणूकांनंतरच्या मान्सून अधिवेशनाची आजपासून सुरुवात होत आहे. देशाला नव्या सरकारकडून भरपूर अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.


नरेंद्र मोदी म्हणाले, "आम्ही बळकट लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. येत्या पाच वर्षात आम्ही संसदेची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करू, देशातील जनतेने सबका साथ सबका विकास याचे समर्थन आम्ही केले आहे. विरोधकांनी त्यांना मिळालेल्या आकडेवारीची चिंता करू नये, त्यांचे मार्गदर्शनाचे स्वागत आहे. संसदेतील आकडेवारीबद्दल त्यांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले.


 

स्वातंत्र्यानंतर लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर महिला खासदार निवडून आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. संपूर्ण बहुमत असलेल्या सरकारला जनतेने पुन्हा एकदा निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्यासह सर्व पक्षांना त्यांनी अधिवेशनात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@