"मला उत्तर मुंबईतून लोकसभेचे तिकीट मिळाले आहे.", अशी घोषणा उर्मिला मातोंडकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शुक्रवारी केली. यावेळी तिच्या चाहत्यांनी या घोषणेचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या मात्र, अभिनेते व सिनेनिर्माते अशोक पंडित यांनी थेट टीका करत डिपॉझिटही वाचणार नाही, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
अशोक पंडित हे सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्याशी संवाद साधत असतात. बऱ्याचदा अशा काही घडामोडींवर थेट व्यक्त होण्याच्या सवयीमुळे ते चर्चेत असतात. असेच काहीशी प्रतिक्रीया त्यांनी बॉलीवुड चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनाही दिली. "आपल्या शेजारील देशांना आपल्या सारखेच प्रेम करा," अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले. हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर पाकिस्तानचा दाखला देत टीकाही करण्यात आली.
Love your neighbor as yourself. https://t.co/fGs0VqTI4b
— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) March 27, 2019
अशोक पंडित यांनीही त्यांच्य़ा शैलीत या ट्विटचा समाचार घेतला. त्यावर आक्षेप घेत त्यांनी भट्ट यांना सुनावले. मी औरंगजेबाला मीठीत घेऊ इच्छीत नाही, असे ट्विट त्यांनी महेश भट्ट यांना उद्देशून केले. ते म्हणाले, "आपण गेल्या कित्येक वर्षांपासून तसे करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, आम्हाला मृत्यू आणि माता-भगिनींवर झालेल्या अत्याचारांशिवाय काहीच हातात आले नाही. काश्मिरमधील लोकांना त्यांचे घर सोडावे लागले."
त्यांनी पाकिस्तानलाही सुनावत 'आम्ही शेजारील देशाशी प्रेम करू इच्छितो, मात्र, तो दहशतवादी आहे. त्यांनी आम्हाला नष्ट करण्याची शपथ घेतली आहे, त्यामुळे ते आमच्या प्रेमाला पात्र नाहीत. अशा औरंगजेबाला मी मीठीत घेऊ इच्छित नाही,', या शब्दात त्यांनी कानउघडणी केली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
अतिक्रमित जागांबाबत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती..