ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये घुसला बिबट्या

    20-Feb-2019
Total Views | 65

 

 
 
 
ठाणे : ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बिबट्या फिरताना दिसला असल्याचे वृत्त आहे. कोरम मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या बिबट्याचा वावर टिपला आहे. कोरम मॉलमधील पार्किंगजवळ या बिबट्याचा वावर होता. कोरम मॉलनंतर आता सत्कार हॉटेलच्या पार्किंग परिसरात हा बिबट्या दिसला आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या बिबट्याचा ते शोध घेत आहेत.
 

ठाण्यात पश्चिमेला असलेल्या समतानगर येथे हा कोरम मॉल आहे. मॉलजवळ निवासी विभाग आणि रुग्णालय आहे. मंगळवारी रात्री कोरम मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसला. रात्री मॉलमधील पार्किंगजवळ बिबट्याचा वावर होता. मॉलमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने याबाबत वनविभागाला कळवले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121