अध्यात्मापलीकडे नेणारे गुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असा आग्रह बंगारू आदिगलर यांनी आपल्या अनुयायांकडे धरला. ‘किमान वाचायला-लिहायला तरी सर्वांना यायला हवे.
 

यंदाचेपद्मश्री पुरस्कारजाहीर झाले आणि गेल्या कित्येक वर्षांपासून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या, आदर्श समाज साकारण्यासाठी, परिश्रम करणाऱ्यांच्या कष्टाचे अखेर चीज झाले. आज त्यांच्या कार्यामुळे हे ‘पद्मश्री पुरस्कार’विजेते समाजासाठी आदर्श झाले. ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात अशा देशभरातील विविध ठिकाणांहून अनेक दिग्गजांना ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच पुरस्कार यादीतील एक नाव म्हणजे बंगारू आदिगलर. तामिळनाडूतील हे आध्यात्मिक गुरू!

 

अध्यात्म म्हणजेआधी आत मी एक.’ हे सत्य ज्याला कळले त्याला अध्यात्म कळले. पण केवळ अध्यात्म कळून उपयोग नसतो, तर त्यातील सद्विचारांचा वापर समाजोपयोगी कार्यासाठी करता यायला हवा. ही दृष्टी बंगारू आदिगलर यांनी त्यांच्या अनुयायांना दिली. बंगारू आदिगलर यांचे अनुयायी त्यांना आदराने ‘अम्मा’ म्हणून हाक मारतात. अम्मा अर्थात आई, लहानशी ठेच जरी लागली तरी माणसाला पहिली आठवण होते ती आपल्या आईची. ‘आ’ आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. आपल्या बाळाला जरासे खरचटले तरी, हाक मारताच जी मदतीला धावून येते, ती म्हणजे आई. धावून आल्यावर ती आपल्या बाळाला नेमके कुठे खरचटलं आहे हे पाहते, त्यावर मलमपट्टी करते. पण झालेल्या जखमेचा बाऊ न करता बाळाला ती पुन्हा उठून उभे राहण्याचे बळ देते, ती आई. कुटुंबसंस्थेतील आईप्रमाणेच बंगारू आदिगलर हे वेळोवेळी अनेकांच्या मदतीसाठी धावून येतात. किंबहुना त्यांनी केलेल्या कार्यामुळे आजवर अनेकांना मदत झाली आहे. म्हणूनच त्याचे अनुयायी त्यांना ‘अम्मा’ असे संबोधतात. त्यांचे अनुयायी त्यांना देव मानतात, ते त्यांनी केलेल्या कार्यामुळे. चेन्नईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेले मेलमारुवंथूर येथील आदिपरमशक्ती सिद्धार पीतम या मंदिरासाठी आलेला निधी बंगारू आदिगलर यांनी समाजकार्यासाठी सत्कारणी लावला. मंदिर संस्थानाद्वारे तमिळनाडूतील गरिबांसाठी त्यांनी शिक्षणाची सोय करून दिली. तसेच आजवर त्यांनी गरीब रुग्णांसाठी अनेक वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले. या मंदिर संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजनही केले जाते.

 

तमिळनाडूतील लोकांच्या मनात बंगारू आदिगलर यांच्याविषयी अपार श्रद्धा आणि प्रेम आहे. परंतु, या भावनेचे रुपांतरण बंगारु आदिगलर यांनी समाजकार्यासाठी केले. आपल्या अनुयायांचे कधी कर्मकांडात बळी जाऊ दिले नाही. मुळात शिक्षणाच्या अभावामुळेच अंधश्रद्धांना फोफावण्यास बळ मिळते. हे बंगारू आदिगलर यांच्या वेळीच लक्षात आले होते. म्हणूनच किमान प्राथमिक शिक्षण तरी सर्वांनी घ्यायलाच हवे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असा आग्रह बंगारू आदिगलर यांनी आपल्या अनुयायांकडे धरला. ‘किमान वाचायला-लिहायला तरी सर्वांना यायला हवे. जेणेकरून कोणी आपल्या भोळ्या स्वभावाचा आणि आपल्या अशिक्षित असण्याचा गैरफायदा घेणार नाही,’ असा हेतू त्यामागे होता. हेतुपुरस्सरपणे त्यांनी मंदिर संस्थानात देणगी स्वरूपात जमा होणारा निधी शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी वापरलाआजारपणामध्ये अनेक लोक पैशांच्या अभावामुळे वैद्यकीय उपचार घेत नाहीत. त्याऐवजी अंधश्रद्धेपोटी ते बाबा-बुवांकडे जाऊन फुकटात दिलेले अंगारे-धुपारे लावण्याचा पर्याय स्वीकारतात. हे बंगारू आदिगलर यांनी आपल्या आसपास घडताना पाहिले होते. हा प्रकार रोखता यावा, यासाठी त्यांनी मंदिर संस्थानातील निधी वापरून गरीब रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार देण्यास सुरुवात केली. त्यासाठी अनेक वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले.

 

गरिबांपुढील आणखी एक मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे त्यांच्या मुलांच्या लग्नकार्यासाठी करावा लागणारा खर्च. हा प्रश्न सोडविण्यासाठी बंगारू आदिगलर यांनी रामबाण उपाय शोधला. मंदिर संस्थानाद्वारे ते सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करू लागले. सामूहिक विवाह सोहळ्याच्यानिमित्ताने आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभेल, असा विचार करून अनुयायांनी त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. बंगारू आदिगलर हे स्वत: विवाहित आहेत. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली अशी एकूण चार अपत्ये आहेत. त्यांची मुलेही आता संसाराला लागली असून त्यांचे मोठे कुटुंब आहे. घर-संसार सांभाळून, आध्यात्मिक गुरू होणे, कोणत्याही मोहाला बळी न पडता. संसार-प्रपंच सांभाळून समाजसेवा करत राहणे. हे खूप कमी लोकांना जमते. भारतात असे आध्यात्मिक गुरू तुम्हाला अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके भेटतीलदेशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘पद्मश्री पुरस्कार’ बंगारू आदिगलर यांना घोषित झाल्यावर त्यांच्या अनुयायांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ‘बंगारू आदिगलर हे आध्यात्मिकतेच्या पलीकडे आहेत. समाजात लोकांमध्ये भेदभाव निर्माण करणारे अडथळे त्यांनी दूर करायला घेतले आहेत,’ असे त्यांच्या अनुयायांचे म्हणणे आहे. कार्य महान असूनही बंगारू आदिगलर हे आजवर नेहमीच प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून लांब राहिले. तुम्ही कोण आहात? हे नेहमी महत्वाचे नसते. तर तुमचे कार्य काय आहे? हे महत्त्वाचे असते. लोकांनी तुमच्या कार्यामुळे तुम्हाला ओळखावे, याचा प्रत्यय बंगारू आदिलगर यांच्याकडे पाहून येतो. अशी ही सामाजिक प्रगती साधाणार्‍या या आध्यात्मिक गुरूच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@