शिवसैनिकांचा उद्दामपणा ! मुख्यमंत्र्याबद्दल पोस्ट टाकल्याने जबरदस्ती केले मुंडन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबूकवरून टीकेची पोस्ट टाकल्यामुळे शिवसैनिकांनी वडाळ्यामधील एका व्यक्तीला मारहाण केली. प्रथम त्याला मारहाण करून नंतर जबरदस्ती मुंडन करण्यात आले. माहितीनुसार, राहुल तिवारी उर्फ हिरामणी तिवारी वडाळामधील रहिवासी असून त्याने जामिया प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जामिया येथे झालेल्या कारवाईची तुलना १९१९मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. यावर राहुल तिवारी याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या तुलनेवरून त्यांच्यावर टीका करणारी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना काही लोकांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. थोड्याचवेळात तिवारीने ती पोस्ट काढून टाकली.

 
 
 

रविवारी शांती नगर परिसरात राहत असलेल्या तिवारी यांच्या घराबाहेर शिवसेनेचे कार्यकर्ते समाधान जाकदेव आणि प्रकाश हसबे यांच्यासह काही शिवसैनिकांनी त्यांना मारहाण करून त्याचे जबरदस्ती मुंडन केले. 'शिवसैनिकांनी कायदा हातात न घेता त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करायला हवी होती,' असे राहुल तिवारी यांनी सांगितले. आता मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासन यावर कारवाई करणार का? असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@