कॉर्निया ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया म्हणजे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019
Total Views |

cc_1  H x W: 0


कॉर्निया ट्रान्सप्लान्ट म्हणजे काय? ते का व कधी केले जाते? याविषयी माहिती देणारा हा लेख...


भारतामध्ये युनिलॅटरल कॉर्निया अंधत्व असलेल्या व्यक्तींची संख्या ही २०२० पर्यंत १०.६ दशलक्षापर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. यापैकी बहुतांश रुग्णांची दृष्टी कॉर्नियल ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या पुन्हा मिळवून देता येते. कॉर्निया म्हणजे डोळ्याचा सर्वात बाहेरचा भाग. यातील डोळ्यांच्या संरक्षणासाठी असलेले पटल धुळीचे कण, जंतू यांना रोखणारी संरक्षक भिंत म्हणून काम करते, तसेच प्रकाशाचे अपवर्तन होण्यामध्येही त्याची भूमिका असते. डोळ्याच्या एकूण दृष्टीक्षमतेपैकी दोन-तृतीयांश क्षमता या भागाची असते. कॉर्निया हा पेशींच्या तीन स्तरांनी बनलेला असतो व त्यांच्यामध्ये दोन पातळ अंत:स्तर असतात. एखाद्या आजारामुळे, दुखापतीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे कॉर्नियाला इजा झाल्यास तुमच्या पाहण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो. कॉर्नियाची संपूर्ण हानी झाल्यास दृष्टी जाते व अशावेळी कॉर्निया ट्रान्सप्लान्टची गरज पडते.


कॉर्निया ट्रान्सप्लान्ट प्रक्रियेमध्ये तुमच्या कॉर्नियाच्या जागी नवीन कॉर्निया बसविण्यात येतो
, जेणेकरून तुमच्या डोळ्याचा सर्वात वरचा स्तर स्वच्छ व्हावा. या प्रक्रियेमध्ये तुमचे सर्जन खराब झालेले कॉर्नियल टिश्यू काढून टाकतात व मृत मानवी दात्याकडून मिळालेले नवे, निरोगी टिश्यू त्याजागी बसवतात.


कॉर्निया ट्रान्सप्लान्टची गरज आहे
, हे कसे ओळखावे?

तुम्हाला जाणवणारी खालील लक्षणे दूर करण्यासाठी कोणते औषधोपचार किंवा पर्यायी उपचारपद्धती वापरता येईल, हे तुमचे डॉक्टर ठरवतील. त्यानंतरही समस्या तशीच राहिल्यास कॉर्निया ट्रान्सप्लान्टचा पर्याय सुचविला जाईल. ही लक्षणे पुढीलप्रमाणे :

  • डोळ्यांना सतत त्रास जाणवणे
  • डोळ्यांमध्ये वेदना
  • डोळे लालसर होणे
  • धूसर आणि धुरकट दिसणे
  • संपूर्ण अंधत्व


कॉर्नियल ट्रान्सप्लान्टसाठी तयारी कशी कराल
?

कॉर्नियल ट्रान्सप्लान्टच्या निर्णयापर्यंत येण्याआधी डोळ्यांची अगदी कसून तपासणी केली जाईल. तुमचे डॉक्टर तुमच्या डोळ्यांचे अत्यंत काटेकोरपणे माप घेतील, शस्त्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करू शकतील, अशा काही समस्यांवर उपाय करतील. आपल्या चालू वैद्यकीय स्थितीबद्दल, चालू असलेल्या औषधोपचारांची किंवा तुम्ही स्वत:हून एखादे औषध घेतलेले असल्यास त्याची माहिती डॉक्टरांना द्या. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी तुमचे डॉक्टर्स तुम्हाला या शस्त्रक्रियेसाठी नेमकी कशाप्रकारची तयारी करायची, याचे मार्गदर्शन करतील.


कोणत्या प्रकारचे कॉर्नियल ट्रान्सप्लान्ट शक्य आहे
?

एखाद्या आजारामुळे संपूर्ण कॉर्नियाचे नुकसान झाले असल्यास असा कॉर्नियाच्या जागी निरोगी दात्याचा कॉर्निया बसवला जातो. या तंत्रामध्ये नवा कॉर्निया जागच्या जागी राहावा, यासाठी अनेक टाके घालावे लागतात. सध्या सुयोग्य रुग्णांना सुटरलेस कॉर्नियल ट्रान्सप्लान्टेशनचा पर्याय उपलब्ध आहे. या पद्धतीमध्ये कॉर्नियाचा खराब झालेला स्तरच तेवढा बदलला जातो व टाके न घालता त्याजागी दात्याच्या कॉर्नियाचा स्तर तिथे बसवला जातो. या पद्धतीचे फायदे आहेत, पण ती केवळ काही रुग्णांसाठी वापरता येते.


कॉर्नियल ट्रान्सप्लान्टनंतर काय घडते
?

तुम्हाला शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच दिवशी घरी पाठवले जाईल. डोळ्याच्या ठिकाणी काहीशी अस्वस्थता जाणवेल व काही दिवसांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यावर ‘आय पॅच’ लावावा लागेल. बरे होण्याची प्रक्रिया सहजतेने व्हावी यासाठी तसेच शरीराकडून नवा कॉर्निया नाकारला जाऊ नये वा जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी आय ड्रॉप्स किंवा तोंडी घ्यायची औषधे लिहून दिली जातील. शांत राहणे, दिलेल्या सूचना बारकाईने पाळणे व काही वेगळे जाणवल्यास डॉक्टरांना त्याची वेळोवेळी माहिती देणे हितावह ठरेल.


पुढील गोष्टी जाणवल्यास तत्काळ वैद्यकीय मदत मिळवा

  • खूप उलट्या होणे
  • डोकेदुखी
  • डोळ्यांमध्ये खूप वेदना होणे.


साधारणपणे एका आठवड्यात डोळा नीट होतो
. आठवडाभरासाठी डोक्यावरून आंघोळ करू नये. काही काळापर्यंत, विशेषत: शस्त्रक्रियेनंतर पहिल्या वर्षामध्ये पुनर्रोपित कॉर्निया शरीराकडून नाकारला जाऊ शकतो, कारण या नव्या पेशी बाहेरून आल्याची जाणीव शरीराला होते. या गुंतागुंती आटोक्यात ठेवण्यासाठी स्टिरॉइड आय ड्रॉप्स लिहून दिले जातील किंवा जास्तच धोका असलेल्या प्रकरणांमध्ये तोंडावाटे घ्यायची औषधे वर्षभरासाठी वा त्याहून अधिक कालावधीसाठी लिहून दिली जातील. सरत्या काळाबरोबर शरीराकडून नवा कॉर्निया नाकारला जाण्याची शक्यता कमी कमी होत जाईल, पण ती पूर्णपणे संपून जाणार नाही. तेव्हा असे घडत असल्याचे पुढीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

  • दृष्टी अधू होत जाणे
  • डोळे लालसर होणे
  • वेदना
  • प्रकाश सहन न होणे


कोणत्या व्यक्ती नेत्रदान करण्यास पात्र आहेत
?

वयाच्या पहिल्या वर्षापासूनच प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते. त्यासाठी आपण मृत्यूपश्चात नेत्रदान करणार असल्याची साधी प्रतिज्ञा तुम्हाला करावी लागेल. पूर्वी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या, रक्तदाब व मधुमेह असलेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात. जिवंतपणी नेत्रदान करण्याची परवानगी नाही.


-
डॉ. पी. सुरेश

(लेखक फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे ऑप्थॅल्मिक सर्जन आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@