मुरबाड : विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे बारामतीचे उमेदवार अजित पवार यांनी भाजप उमेदवार गोपिचंद पडळकर यांचा १ लाख ४९ हजार मतांनी पराभव केला त्यानंतर हा रेकॉर्ड ब्रेक विजय मानला जात आहे. मात्र, भाजप आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदूराव यांचा तब्बल १ लाख ६७ हजार ८५९ मतांनी पराभव केला आहे.
किसन कथोरे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून जाणार आहेत. मुरबाडमध्ये आमदार कथोरे यांनी अश्वरुढ पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करत विजय रॅलीला सुरुवात केली. विजयी रॅलीत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला.
एका आमदारासह 'मनसे'चे इंजिन यार्डाबाहेर@mnsadhikrut @RajThackeray @rajupatilmanase #RajuPatil #MNS #Manase #MahaMTBResults #महाराष्ट्राचीरणधुमाळी #Maharashtra #maharashtraassemblyelection2019 #maharashtraassemblyelection https://t.co/aUOEvrQXLB
— महा MTB (@TheMahaMTB) October 24, 2019