शरद बोबडे : एक मराठी सरन्यायाधीश

    22-Oct-2019
Total Views | 66




सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य सरन्यायाधीशपदी लवकरच एक मराठी भाषिक चेहरा विराजमान होणार आहे
. सर्वसामान्य नागपूरकर ते मुख्य सरन्यायाधीश अशी वाटचाल करणार्या शरद बोबडे यांच्याविषयी...



सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत
. या पदावरून निवृत्त होणार्‍या व्यक्तीनेच आगामी सरन्यायाशीधांचे नाव केंद्र सरकारकडे सुचविण्याची परंपरा आपल्या संविधानात आहे. गोगोई यांनी या परंपरेनुसार न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे नाव या पदासाठी सुचवले आणि तमाम मराठी भाषिकांची मान अभिमानाने देशात उंचावली गेली. कारण, सरन्यायाधीशपदी एक मराठी भाषिक चेहरा विराजमान होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच त्यांना या पदाची शपथ देतानाचा क्षण आपण सर्व अनुभवणार आहोत. ‘एक सर्वसामान्य नागपूरकर ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीशअशी वाटचाल करणार्‍या शरद बोबडे यांनी आत्तापर्यंत आपल्या कार्यकाळादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांचा निकाल दिला आहे. त्यामुळेच या महत्त्वाच्या पदासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



शरद बोबडे हे मूळचे नागपूरचे
. त्यांचा जन्म २४ एप्रिल, १९५६ रोजी नागपुरातच झाला. शिक्षणात ते लहानपणापासूनच हुशार. शिकण्याची आवड असणार्‍या शरद बोबडे यांनी विधी क्षेत्रातच आपले करिअर घडविण्याचा निर्णय घेतला. नागपूरच्या असणार्‍या या बोबडे कुटुंबाचे विधी क्षेत्राशी फार जुने नाते. शरद बोबडे यांचे आजोबा श्रीनिवास बोबडे हे एकेकाळी नागपुरातील प्रसिद्ध वकील म्हणून ओळखले जायचे. श्रीनिवास यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आणि शरद बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे यांनीही विधी क्षेत्रातच उल्लेखनीय काम केले. अरविंद बोबडे महाराष्ट्राचे १९८० आणि १९८५ असे दोन वेळा महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. या शिवाय त्यांचे बंधूविनोद बोबडे हेदेखील सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते. संपूर्ण कुटुंबच विधी क्षेत्राशी निगडित असल्याने शरद बोबडे यांनीही याच क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्णय घेतला. यासाठी लहानपणापासूनच त्यांनी जिद्दीने तयारी करण्यास सुरुवात केली. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातूनच एलएलबीची पदवी संपादन केली.



एलएलबीची पदवी मिळविल्यानंतर बोबडे यांनी १९७८ साली
महाराष्ट्र बार कौन्सिल’मध्ये वकील म्हणून काम सुरू केले. येथे काही काळ काम केल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली करण्यास सुरुवात केली. येथूनच त्यांच्या वकिलीच्या प्रवासास खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. येथे अनेक खटल्यांमध्ये काम केल्यानंतर १९९८ पासून त्यांना ज्येष्ठ विधिज्ञ पदावरती काम करण्याची संधी मिळाली. येथेही त्यांच्या उत्तम कामाचा धडाका सुरूच होता. मार्च २००० साली ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले. येथे त्यांनी अनेक खटले निकाली काढल्यानंतर १६ ऑक्टोबर, २०१२ रोजी ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. मध्यप्रदेशमध्ये मुख्य न्यायाधीशपदी काम केल्यानंतर एप्रिल २०१३ पासून त्यांची सर्वोच्चन्यायालयात ‘न्यायमूर्ती’ म्हणून नियुक्ती झाली. सर्वोच्च न्यायालयात सध्या ते दुसर्‍या क्रमाकांचे वरिष्ठ न्यायाधीश आहेत. तसेच महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही ते कार्यरत आहेत.



न्यायाधीश बोबडे यांचा अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समावेश आहे
. ‘आधार’ संदर्भात निर्णय देणार्‍या तीन सदस्यीय खंडपीठात त्यांचा समावेश होता. ‘आधार’ कार्ड नसलेल्या भारतीयांना मूलभूत सेवा आणि सरकारी अनुदानापासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्णय या खंडपीठाने दिला होता. २०१७ साली न्या. बोबडे यांच्या खंडपीठाने आणखी एका महत्त्वाच्या खटल्यात निर्णय दिला. एका महिलेने गर्भपातासाठी केलेली विनंती या खंडपीठाने फेटाळली होती. वैद्यकीय तपासणी अहवालावर आधारित दिलेल्या या निर्णयामुळे २६ आठवड्यांच्या अर्भकाला जीवन मिळाले. एका लहानग्याचे प्राण वाचविण्यासाठी दिलेला हा त्यांचा निर्णय फार महत्त्वाचा मानला जातो. यासोबतच कर्नाटकमध्ये एका पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती.



त्याविरोधात पुस्तकाच्या लेखिका माते महादेवी यांनी याचिका दाखल केली होती
. मात्र, २०१७ मध्ये न्यायाधीश बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने ती बंदी योग्य ठरवत ती याचिका निकाली काढली होती. याशिवाय राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय देण्यातही शरद बोबडे यांचा समावेश राहिला आहे. अशा अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये समावेश असणार्‍या शरद बोबडे यांची नियुक्ती येत्या दिवसांत मुख्य सरन्यायाधीशपदी होण्याची शक्यता आहे. मराठी व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होण्याची ही काही पहिली वेळ नाही. मात्र, अनेक वर्षांनंतर या पदावर मराठी भाषिक व्यक्ती विराजमान होणार असल्याने सर्वांना त्याचा आनंद आहे. बोबडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!




-रामचंद्र नाईक 
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121