पुणेरी पगडीवरून पदवीप्रदान समारंभात गोंधळ

    11-Jan-2019
Total Views | 20


 


पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा ११४ व्या पदवी प्रदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. पगडी वादावरून या समारंभात पुणेरी पगडी घातल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या गोंधळामुळे पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला प्रथमच गालबोट लागल्याची घटना घडली.

 

या सोहळ्यात कुलगुरू आणि विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी 'पुणेरी पगडी' घातल्यामुळे पदवी प्रदान कार्यक्रमाला सुरुवात होताच काही विद्यार्थ्यांनी निदर्शने करत घोषणाबाजी केली आणि पुणेरी पगडीचा निषेध केला. दरम्यान घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी तातडीने या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि कार्यक्रम स्थळापासून दूर केले. त्यानंतर कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला. विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभ ब्रिटिशकालीन गणवेशाऐवजी भारतीय पारंपारिक पोशाखात साजरा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार समारंभात ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा, पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि उपरणे असा गणवेश ठेवण्यात आला. मात्र, या गणवेशाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला होता.

 

विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यकर्यामात पगडीचा वाद निर्माण झाला असताना विद्यापीठाने पुणेरी पगडी रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वाना एक प्रकारचा पोशाख असतानादेखील कुलगुरु, प्राध्यापक आणि इतर मान्यवरांनी पुणेरी पगडी घातली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पदवी प्रदान समारंभात वापरण्यात आलेला पोशाख हा पेशवाईच्या काळातील असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पुणेरी पगडीला काही विद्यार्थ्यांचा विरोध होता. पुणेरी पगडीऐवजी फुले पागोटे वापरण्यात यावे, अशी मागणी काही विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121