विधान परिषदेच्या जागांचे निकाल आज होणार जाहीर

    28-Jun-2018
Total Views | 10


मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे. कोकण-मुंबई पदवीधर आणि नाशिक-मुंबई शिक्षक मतदार संघ अशा एकूण चार जागांसाठी ही मतमोजणी घेण्यात येत असून आज दुपारपर्यंत निकाल समोर येणार आहेत.
गेल्या सोमवारी विधान परिषदेच्या या चार जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांमध्ये या चारही जागांसाठी चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. त्यातही कोकण पदवीधर मतदार संघामध्ये हे तिन्ही पक्ष आमनेसामने असणार आहेत. कोकणामध्ये भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची साथ सोडल्यामुळे डावखरे यांचा परभाव करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांना आपली उमेदवारी दिली आहे. तर सेनेनी देखील याठिकाणी उडी घेऊन संजय मोरे यांना आपली उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोकणामध्ये हे तीन पक्ष आमनेसामने असणार आहेत.
तसेच मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये देखील भाजप आणि सेना यांच्यात उघडउघड लढत होणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघामध्ये भाजपचे अमितकुमार मेहता यांना टक्कर देण्यासाठी म्हणून सेनेनी विलास पोतनीस यांना आपली उमदेवारी दिली आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये सेनाच्या शिवाजी शेंडगे यांच्या विरोधात भाजपने अपक्ष उमेदवार असलेल्या अनिल देशमुख यांना आपला पाठींबा दिला आहे. दरम्यान नाशिक शिक्षक मध्ये देखील अशीच परिस्थितीअसून याठिकाणी देखील भाजप आणि सेना आमनेसामने असणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय

ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे असे लेखी निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना दिले. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर मंत्री श्री. लोढा यांनी पत्राची तातडीने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121