‘या’ फोनची होणार, १० मिनिटात ४० टक्के चार्जिंग

    04-Dec-2018
Total Views | 22

 


 
 
 
मुंबई : स्मार्टफोनच्या दुनियेतील ओप्पो कंपनी आपल्या R सिरिजमधील Oppo R17 Pro हा फोन आज लाँच होत आहे. मुंबईत आज संध्याकाळी ८ वाजता हा फोन लाँच करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर या सोशल मीडिया माध्यमांवर या लाँचिंगच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
 

ओप्पोच्या या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे सुपर vooc फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजिचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे फक्त १० मिनिटात हा फोन ४० टक्के चार्ज करता येणार आहे. असे ओप्पो कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच या फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर यासारखे फीचर्स आहेत. Oppo R17 Pro या फोनला ८ जीबी रॅम आहे. यापूर्वी चीनमध्ये हा फोन लाँच करण्यात आला होता. चीनमध्ये या फोनला ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली होती. चीनमध्ये लाँच झालेल्या फोनची किंमत ४०,८०० रुपये होती. भारतात लाँच होणाऱ्या या फोनला ८ जीबी रॅम असणार आहे. तसेच १२८ जीबीची इंटरनल मेमरी देखील असणार आहे. भारतात Oppo R17 Pro या फोनची किंमत ४३,९०० रुपये असणार आहे. १ डिसेंबरपासून हा फोन खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

 

Oppo R17 Pro ची इतर ठळक वैशिष्ट्ये

 

या फोनला ड्युएल सिम आहे. अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो तंत्रज्ञानावर आधारित हा स्मार्टफोन आहे. ५.२ या कलर ओएसवर हा स्मार्टफोन कार्यरत असणार आहे. ६.४ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले या फोनला देण्यात आला आहे. या फोनला स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर आहे. रॅमच्या बाबतीत या फोनमध्ये ६ जीबी किंवा ८ जीबी असा पर्याय देण्यात आला आहे. फोनची इंटरनल मेमरी मात्र १२८ जीबीच असणार आहे. Oppo R17 Pro या फोनला २० आणि १२ मेगापिक्सेलचा ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी खास २५ मेगापिक्सेलचा कॅमेरा या फोनमध्ये आहे. ३६५० एमएएच क्षमतेची पावर बॅटरी या फोनला आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121