रायगडमधील १९ गावांना भुस्खलनाचा धोका!

    08-Jul-2024
Total Views |
 
Landslide
 
रायगड : राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार माजला आहे. मुंबई आणि कोकण भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी भुस्खलन होण्याची शक्यता जास्त असते. अशातच आता एका सर्वेक्षणात रायगडमधील १९ गावांना भुस्खलनाचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
भूगर्भशास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाडमधील नऊ, पोलादपूरमधील सहा, महासाळा, कर्जत, श्रीवर्धन आणि खालापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाला भुस्खलनाचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
 
हे वाचलंत का? -  एक्सप्रेस रद्द, लोकल ठप्प! मुंबईत पावसामुळे प्रवाशांचे हाल
 
याआधीही २०२१ मध्ये महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला. याशिवाय मागच्या वर्षी इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून ८४ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.