या व्हिडिओमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री नव्या वादात सापडले असून हे प्रकरण अंगाशी येईल असे त्यांना जाणवल्यामुळे “मी असा कोणताही आदेश दिलेला नाही.” अशी प्रतिक्रिया देत, कुमारस्वामी यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. सोमवारी कर्नाटकमध्ये जेडीएसचे नेते प्रकाश (वयवर्ष ५०) यांची हत्या करण्यात आली होती.
प्रकाश आपल्या गाडीने मद्दूरला जात असताना वाटेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. चार दुचाकीस्वारांनी प्रकाश यांच्यावर गोळाबार केला. हल्ल्यात जखमी झालेल्या प्रकाश यांना ताताडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. प्रकाश यांच्या हत्येबाबत कळताच कुमारस्वामी खूप संतापले होते. “प्रकाश हा चांगला माणूस होता. प्रकाशच्या मारेकऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता त्यांना मारून टाका.” असे आदेश कुमारस्वामी पोनवर कोणालातरी देत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/