धुळ्यातील ‘त्या’ आरोपींवर कारवाई होणार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : धुळे महापलिकेत पक्षाची ताकद वाढावी यासाठी पक्षात प्रवेश करणाऱ्यावर विविध आरोप असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल गोटे यांनी अधिवेषण सुरू असताना सभागृहात प्रश्न विचारला. यावेळी गुंड प्रवृत्तीच्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याचेही गोटे म्हणाले. भाजपमध्ये निवडणूकांच्या दरम्यान प्रवेश करणाऱ्यांवर ही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

 

आमदार आणि त्यांच्या पत्नीचे जीवन धोक्यात असल्याचे ते म्हणाले. तसेच यावर कोणी कारवाई करण्यास तयार नसल्याचेही त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेची सभागृहाने दखल घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित दखल घेत प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गोटे यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित दाखल घेत या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@