सत्तेची हवा ठाकरे सरकारच्या डोक्यात गेली आहे : अतुल भातखळकर

    दिनांक  26-Aug-2020 18:35:45
|
Atul bhatkhalkar_1 &

धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा केला तीव्र शब्दांत निषेध!


धुळे : आतापर्यंत राज्यातल्या आमच्यासारख्या विरोधकांना आयटी अॅक्टखाली खटले भरून, अटक करण्याचे काम सरकारने सुरु केले होते. आता त्याचे पुढचे पाऊल गाठत अमानुष मारहाण सिव्हील ड्रेसमधले पोलीस करायला लागले आहेत. ही सत्ता महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारच्या डोक्यात गेलीय! जनता रस्त्यावर आल्यानंतर या सरकारला जशास तसे उत्तर देईल, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध केला आहे.


कोरोना काळात अवाजवी परीक्षा शुल्क आकारणी सरकारने रद्द करावी या मागणीसाठी गेलेल्या अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळ दिलीच नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्याचा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.


मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली पोलीसांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. परिक्षा शुल्क रद्द करावे, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी अशी वागणूक दिल्याने राज्यभरातून या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.