धुळ्यातील दलित वसाहतीवर कट्टरवाद्यांची दगडफेक!

७० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

    15-Jul-2024
Total Views |

Sakri-Dhule news

मुंबई (प्रतिनिधी) : (Sakri Dhule News)
धुळे जिह्यातील साक्री येथे आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागात दोन गटात तुफान दंगल उसळल्याचे नुकतेच समोर आले. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण तर झाले होते. वाद वाढल्यानंतर कट्टरतावाद्यांनी दलित वस्तीवर दगडफेक केल्याचे निदर्शनास आले. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ७० हून अधिक जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

हे वाचलंत का? : गरीब आदिवासींची दिशाभूल करून धर्मांतर केलं जातंय!

दंगलीदरम्यान पाच जण जखमी झाले असून सर्व संशयितांवर भारतीय न्याय संहिता कलम १०९, १८९(२), १८९(४), १४९(३), १९१(२), १९१(३), १९०, १८९(५) तसेच काहींवर ११५ (२), ३५२, ३५१ (१), ३५१ (२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साक्री येथील सकल हिंदू समाजाने मुख्य आरोपीवर कारवाई करण्याची विनंती पोलिसांना केली आहे. पोलिसांनी या घटनेच्या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करावी, मुख्य आरोपींविरुद्ध नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, कोणत्याही विशिष्ट धर्माच्या लोकांची बाजू घेऊ नये, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.