धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण आग; ४ मृत्यु २ जखमी

    18-Apr-2023
Total Views |
 
dhule
 
 
धुळे : धुळ्यातील साखरी तालुक्यातील निजामपूरपासून पुढे तीस किमी अंतरावर असलेल्या चिखलीपाडा गावातील एका मेणबत्तीच्या कारखान्याला शॉर्टसर्किट झाल्यानं भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीमध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना नंदुरबारला रुग्णालयात हालवण्यात आलं आहे.
 
भवानी सेलिब्रेशन या मेणबत्ती निर्मिती करणाऱ्या कारखान्यात मंगळवारी दुपारी अचानक स्फोट झाला. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात मृत्यू झालेल्या महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, धुळे साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.