धुळ्यात रा.स्व.संघाचे शानदार, शिस्तबद्ध संचलन ना.सुभाष भामरे पूर्ण गणवेशात सहभागी: अनेकांच्या भुवया उंचावल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2018
Total Views |

 
धुळ्यात रा.स्व.संघाचे शानदार, शिस्तबद्ध संचलन
 
ना.सुभाष भामरे पूर्ण गणवेशात सहभागी: अनेकांच्या भुवया उंचावल्या
 
धुळे, २० ऑक्टोबर
विजयादशमीनिमित्त रा.स्व.संघातर्फे येथील वाखारनगरातील अरिहंत मंगल कार्यालयासमोरील भव्य प्रांगणातून सकाळी ७ ला सघोष पथसंचलनाला सुरुवात झाली.
जिल्हा संघचालक संजय चौधरी, शहर संघचालक डॉ.पंकज देवरे, प्रसिद्ध सराफ व्यवसायी अजय नाशिककर यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले.
वाखारकरनगर, अरिहंत मंगल कार्यालय परिसर, गजानन कॉलनी अशा सुमारे ४-५ कि.मी. मार्गावर हे सघोष पथसंचलन काढण्यात आले. मूळ स्थानी समारोप झाला.
 
 
विजयादशमी उत्सव
तत्पूर्वी १४ रोजी संघाचा विजयादशमी उत्सव दत्तमंदिर चौकात पंचवटी गॅस एजन्सी समोरील मैदानात झाला. प्रमुख पाहुणे नवकार गोशाळेचे सचिव राजेंद्र चौधरी आणि प्रमुख वक्ते वनवासी कल्याण आश्रमाचे अ.भा.संघटनमंत्री अतुल जोग होते. स्वयंसेवक व नागरी वेशातील माता-भगिनी आणि संघप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
* पूर्ण गणवेशात सुमारे ४५० स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी झाले होते.
* त्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.सुभाष भामरे यांचाही समावेश होता. (त्यांना पाहून सर्वच थरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या...दिवसभर याबाबत शहरभर चर्चा होत होती.)
* मुख्य मार्गावर धर्म व राष्ट्रप्रेमी माताभगिनींनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या.
* चौकाचौकात व मार्गावर दुतर्फा जमलेल्या धर्म व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या समूहाने पुष्पवृष्टी करीत आणि ‘ंवंदे मातरम्’ तसेच ‘भारत माता की जय’ अशा उच्चारवात घोषणा देत संचलनाचे स्वागत केले.
* वाटेत जागोजागीही अनेक परिवार आणि नागरिकांतर्फे पुष्पवृष्टी करीत संचलनाचे स्वागत झाले.
 
@@AUTHORINFO_V1@@