अल्पेश ठाकोरांचा शिरच्छेद करा आणि मिळावा...

    15-Oct-2018
Total Views | 22


 


उत्तर प्रदेश: गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना करून त्यांना तिथून पळवून लावल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर चर्चेत आले होते. याच संबंधी उत्तर प्रदेशमध्ये ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस देण्यात येईल अशी खळबळजनक घोषणा करण्यात आली आहे. महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड संघटनेने यासंदर्भातील पोस्टर्स पूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी लावले गेले आहेत. पोलिसांकडून हे पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. तसेच समाजामध्ये असंतोष निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने ही माहिती दिली.

 

‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’चे राष्ट्रीय अध्यक्ष भवानी ठाकूर यांनी सांगितले की, "अल्पेश ठाकोर आणि त्यांचे कार्यकर्ते हे राक्षसी प्रवृत्तीचे असून ते गरीब कामगारांना मारहाण करतात. हे लोक देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. ठाकोरचा शिरच्छेद करणाऱ्याला आम्ही एक कोटीचे बक्षीस जाहीर केले असून त्यासंदर्भात जागोजागी पोस्टर्स लावले आहेत. जर ठाकोर गुजरात सोडून बाहेर जाणार नसतील तर आम्ही गुजरातमध्ये घुसून त्यांचे शिरच्छेद करू."

 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोशल मीडियावर बहराइचमध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले असून त्यानंतर हे पोस्टर्स जोरदार व्हायरल झाले. आता हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे." तसेच समाजात असंतोष पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. पोस्टर्स हटवण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले असून पोस्टर्स लावणाऱ्यांची चौकशी करणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121