नामांतराचे राजकारण

    29-Dec-2017   
Total Views |
 
 
 
 
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचेच नाव असल्याचा निर्वाळा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिल्याची घोषणा केल्यानंतर विधीमंडळ अधिवेशनात विनोद तावडे यांनी शासनाने असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
 
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून कोणे एके काळी महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. १९७८ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना जनमताच्या रेट्यामुळे नामांतराचा प्रश्न पुढे ढकलावा लागला. पण, जेव्हा ते १९९४ साली पुन्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तार करून या वादाला पूर्णविराम दिला. पुणे विद्यापीठाचेही नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. त्यातही ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नाव असावे, अशी मागणी काही संघटनांची होती. नामांतराचा हा सिलसिला इतर राज्यातही आहे. राजस्थानमध्येही अजमेर शासकीय महाविद्यालयाचे नाव बदलून सम्राट पृथ्वीराज चौहान असे करण्यात आले. उत्तरप्रदेशातही मायावती आणि अखिलेश या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यकाळात किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाचे नाव बदलले. मायावतींनी या विद्यापीठाला शाहू महाराजांचे नाव दिले, तर अखिलेश सत्तेवर येताच त्यांनी पूर्वीचे नाव कायम ठेवले.
 
मायावतींना फक्त नामांतर आणि पुतळ्यातच रस होता. आंबेडकर, शाहू यांच्या नावाचा पुरेपूर राजकारण मायावतींनी केला आणि आजही करतात. हे चाणाक्ष उत्तर प्रदेशच्या मतदारांनी ओळखले आणि त्यांना खुर्चीपासून दूर केले. खरंतर एका मोठ्या नेत्याचा योग्य सन्मान म्हणजे त्यांच्या नावाने संस्था उभारणी करणे, संस्थेच्या माध्यमातून नेत्याचे विचार आणि कार्याचा योग्य वारसा चालवणे क्रमप्राप्त असते. पण, संस्था उभारणीसाठी दूरदृष्टी असावी लागते. नेत्यांचे नाव विशिष्ट संस्थेला दिल्यास अनुयायांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. आपल्या नेत्याचे नाव संस्थेला देण्यासाठी आग्रह धरण्यापेक्षा अनुयायांनी आपल्या समाजातील किंवा राज्याच्या जनतेच्या मूळ प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठात मोठ्या नेत्यांच्या नावे शिष्यवृत्ती देण्यास प्रारंभ करावा. काही नेत्यांच्या नावे शिष्यवृत्ती चालतेही, पण त्यांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. फक्त शिक्षण नव्हे, तर व्यक्तीच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे त्यासाठी आग्रह धरणे गरजेचे आहे.
 
 
 
- तुषार ओव्हाळ  
 
 
 

तुषार ओव्हाळ

मास मीडियामध्ये पदवी. मराठी वृत्तवाहिनीसाठी ३ वर्षे राजकीय आणि इतर संशोधन. राज्यशास्त्र विषयात रूची. वाचनाची आवड. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादकपदी कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
सौरग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग ; विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

सौरग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग ; विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेसाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांपैकी सहा महिन्यात सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121